आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Pankaja Palve News

डोळ्यांतील अश्रू सारले, परिवर्तनासाठी उभी राहिले -पंकजा पालवे-मुंडे यांची भावनिक साद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माझदुख, वेदना सगळं बाजूला ठेवले, वडील गेले म्हणून खोलीत बसून रडणारी मी नाही, मैदानात उतरून लढणारी आहे, सामान्य माणूस शासनकर्ता व्हावा हे गोपीनाथरावांचे स्वप्न होते, त्यांच्या पूर्ततेसाठी आणि परिवर्तनासाठी आपल्यासमोर उभी आहे. तुम्ही आहात माझ्या सोबत...हात वर करा मूठ आवळा अन् घ्या शपथ... ही सार्थ हाक आहे आमदार पंकजा मुंडे-पालवेंची.
आमदार पंकजा मुंडे यांनी अशी भावनिक साद घालताच उपस्थित जनसमुदाय काही वेळासाठी स्तब्ध झाला. पंकजा यांची संघर्ष यात्रा सोमवारी सोलापुरात आली होती. पंकजा म्हणाल्या, ब्रिटिशांपेक्षाही अधिक हाल करणाऱ्या आघाडी सरकारला आपल्याला जाब विचारायचा आहे. बेरोजगारी, शेतकऱ्याच्या आत्महत्या, भ्रष्टाचार या मुद्यांचा उल्लेख करत भ्रष्ट सरकारला खाली खेचणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या काळात, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी स्वत:ला झोकून दिले नसते तर आज आपण येथे राहिलो नसतो. त्यांचे विचार घेऊन परिवर्तनासाठी, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राज्यभर फिरणार आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेस राष्ट्रवादीचा नामोल्लेख केला नाही. परंतु आघाडी सरकारचे मात्र वाभाडे काढणाऱ्या बाबी मुद्देसूद मांडल्या. सुमारे सात मिनिटांच्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांची देहबोली आणि आवाजातील चढउतार उपस्थितांनी अनुभवला. माझे नक्षत्र अचानक निघून गेले, लोक माझ्यात साहेबांना बघतात पण मी तुमच्यात साहेबांना बघते असे म्हणत त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घालताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली.
या वेळी मंचावर खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, यात्रेचे प्रमुख सुरजितसिंग ठाकूर, आ. विजयकुमार देशमुख, सिद्रमप्पा पाटील, संघटनमंत्री सुनील कर्जतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. पंकजा यांची संघर्ष यात्रा सोमवारी सोलापुरात पोहोचली. या वेळी त्यांनी सभेला संबोधित केले.
संघर्ष रॅली नसून विजयी रॅली, भाजप आमदार पंकजा पालवे-मुंडे यांची भावनिक साद
रॅलीदरम्यान नागरिकांचा उत्साह पाहता मला विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचाराला यायची गरज नाही असे म्हणत ही संघर्ष रॅली नसून विजयी रॅली असे सांगत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांची मने जिंकली.