आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtrian Actor Rupesh Kumar Hit In Tollywood Film

कन्नड, मराठी चित्रपटांमध्ये गाजतोय अक्कलकोटचा रूपेशकुमार, लिमका बुकात नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दाक्षिणात्यचित्रपटांमध्ये खलनायकाच्या अतिशय दमदार भूमिका करत सोलापूरजवळील अक्कलकोटच्या तरुण कलाकाराने आपली वेगळी छाप चित्रपटसृष्टीवर सोडली आहे.
साडेसहा फूट उंची, पहाडी छाती भारदस्त आवाज असलेल्या अक्कलकोटच्या रूपेशकुमारने कन्नड फिल्म इंडस्ट्रीत स्थान निर्माण केले आहे. शिक्षणही मंगरुळे प्रशालेत जाले. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केला. गुजरातमधील बडोद्यात रामानंद सागर यांच्या फिल्म युनिव्हर्सिटीत फिल्म अ‍ॅक्टिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर आँखे मालिकेत एक भूमिका मिळाली.

सचिन पिळगावकरांनी मराठीतील नवरा माझा नवसाच्या यशानंतर कन्नड भाषेत याचा रिमेक काढला. चित्रपटाचे नाव ठेवले एकदंता. यात कन्नडमध्ये हिट असलेल्या रमेश अरविंद विष्णुवर्धन यांच्यासह रूपेशकुमारला एक मुख्य भूमिका मिळाली. सचिनच्या आयटम साँगबरोबर चित्रपटही भरपूर गाजला आणि रूपेशकुमारची भूमिकाही.

टॅलेंट बाहेर काढावा
-देवानेप्रत्येकात काही ना काही दिलेले असते. ते टॅलेंट बाहेर काढणे गरजेचे असते. वडील शिक्षक असून तेही रंगभूमी कलावंत आहेत. तो वारसा मी पुढे सुरू ठेवण्याचा प्रयास केला. अल्पावधीत मला सोनीवरील सीआयडी मालिकेचे दिग्दर्शक सुधीर कसबे यांच्या, मुंगारुमळे चित्रपटाचे निर्माते योगराज भट्टांच्या स्नेक नागा भाग्यराज या चित्रपटात खलनायकाचे काम मिळाले आहे. मकरंद अनसापुरेंच्या भागम भागचे दिग्दर्शक, सोलापूरचेच युवराज नरोटे यांच्या आज पंतप्रधान येणार या चित्रपटातून मी मराठीत पदार्पण करत आहे.” रूपेशकुमारतिम्माजी, कलांवत

रूपेशकुमार याने स्टार प्लसवरील साईबाबा मालिकेत मारवाडी सेठची भूमिका, जय अंबे माँ मध्ये राजा क्षत्रिय, पोलिस स्टोरी २, मेराहुणीगे तसेच बुद्धिवंता चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. सध्या झी कन्नडावर राधा कल्याणा, तर उदया टीव्हीवरील महाभारतमध्ये अभिमन्यूची भूमिका साकारत आहे. पीटर इंग्लंडच्या जाहिरातीत धोनीबरोबर तर क्लीन अ‍ॅण्ड क्लिअर शाँपूचा कर्नाटकचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे.
रूपेशच्या ऑपरेशन अंकुशा चित्रपटाची एकाच जागी खूप काळ चित्रीकरणासाठी लिमका बुकमध्ये नोंद झाली. उदया िटव्हीवरील १६५५ भागाच्या रंगोली मालिकेचीही नोंद लिमकामध्ये झाली आहे.