आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्रीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाशिवरात्री निमित्तशहर परिसरातील मंदिरात शिवालीलामृत पारायण, रुद्राभिषेक, हरिपाठ, भजनसंध्या आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा मुख्य कार्यक्रम साजरा होणार आहे.
सिद्धनागनाथदेव स्थान-
श्रीसिद्धनागनाथ देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे रुद्राभिषेक, शिवलीला, अमृत सामुदायिक पारायण, हरिपाठ, प्रवचन भजनसंध्या असे कार्यक्रम होणार आहेत. महाशिवरात्री दिवशी सायंकाळी वाजता पालखी मिरवणूक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे.
शिवयोगधाम,शेळगी
शेळगी परिसरातील श्री शिवयोगधाम येथे मंगळवारी सकाळी सहा ते नऊ यावेळेत सामूहिक इष्टलिंग पूजा होणार आहे. तसेच रात्री नऊ ते दहा शुभाशीर्वाद धर्मसंदेश होणार आहे, याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने उद्या महासत्संग कार्यक्रम-
सोलापूर आर्टऑफ लिव्हिंग, सोलापूर माहिती केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि.१७) महाशिवरात्री ध्यान महासत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. जुळे सोलापुरातील डी मार्टलगतच्या के. एल.ई. इंग्लिश मीडियम स्कूलच्या हिरवळीवर सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ओम नम: शिवाय मंत्रस्नान, भगवान शिव आराधना, भजन आणि प्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रघुराज चौहान यांनी केले आहे.