आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Basveshwar Jayati Celebration In Solapur

बसवेश्वर मिरवणुकीत डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेले तीन दिवसांच्या बौद्धिक व्याख्यानमालेनंतर मंगळवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. विविध मंडळांनी फुले आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या वाहनांतून मिरवणूक काढली. एलईडी, शार्पी दिव्यांचा लखलखाट डीजेच्या दणदणाटाने तरुणाईमध्ये उत्साह संचारला. शिस्तबद्ध शांततेत निघालेल्या मिरवणुकीत फक्त फिल्मी गीतांवरील तरुणांचे नृत्य हेच मिरवणुकीचे एकमेव आकर्षण होते.

बाळीवेस येथे सायंकाळी ७.३० वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त विजय काळम-पाटील, सभापती पद्माकर काळे, राजशेखर शिवदारे, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश हत्ती, गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेवक जगदीश पाटील, नंदकुमार मुस्तारे, अनिल सिंदगी आदींची उपस्थिती होती.

मिरवणुकीत मध्यवर्ती मंडळासह महारुद्र प्रतिष्ठान, सिटी फायटर्स, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव, कै. राजेश कोठे सामाजिक संस्था, स्वराज्य प्रतिष्ठान या मंडळाचा प्रामुख्याने सहभाग होता. बाळीवेस येथून निघालेल्या मिरवणुकीची चाटी गल्ली, मंगळवार पेठ पोलिस चौकी, भुसार गल्ली, कुंभार वेसमार्गे कोंतम चौकातील बसवेश्वर पुतळा येथे सांगता करण्यात आली.

कंटनेरभर साउंड...

महात्मा बसवेश्वर मिरवणुकीमध्ये सात मंडळांचा सहभाग होता, मात्र मिरवणुकीत डीजे साउंडचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचे दिसले. साउंडबरोबरच एलईडी दिव्यांची संख्या मोठी होती. काही मंडळांनी स्क्रीनचीही व्यवस्था केली होती. मध्यवर्ती मंडळाने पारंपरिक वाद्यांना पसंती देत नाशिक ढोल आणले होते. वाद्याच्या आवाजावर नृत्य करणारा घोडा मिरवणुकीत आकर्षण ठरले.