आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बिबट्यांना सांभाळण्याचे आव्हान, प्राणिसंग्रहालयातील सुरक्षेची जबाबदारी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात उत्तर प्रदेशातून शनिवारी चार पाहुणे बिबटे सोलापुरात दाखल झाले. त्यामुळे उद्यानाच्या वैभवात भर पडणार आहे. मात्र, यंत्रणा सक्षम होण्यापूर्वीच त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या पदाधिकारी अधिका-यांसमोर आता प्राणी संग्रहालयाची देखभाल संरक्षणाचे मोठे आव्हान आहे.
दहा वर्षांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील 26 काळविटांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणाची चौकशी झाली. पण, अद्याप अहवाल गुलदस्त्याच असून दोषी उजळमाथ्याने फिरतात. त्या प्रकरणामुळे सोलापूरच्या प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाबद्दल वन्यजीव अभ्यासकांमध्ये नाराजी आहे. त्या दुर्घटनेतून प्रशासनाने बोध घेतला नसल्याचे त्यानंतर अनेक दुर्घटनातून स्पष्ट झाले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) यांच्या निकषानुसार प्राणिसंग्रहालयांमध्ये झालेल्या बदलांची गंभीर दखल घेतली. संग्रहालय बंद करण्याची नोटीस त्यांनी महापालिका प्रशासनाला दिली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विशेष लक्ष घालून प्राणिसंग्रहालयाच्या सुधारित आराखड्यासाठी विशेष तरतूद करून कामांना सुरवात केली. गुडेवारांच्या धडाकेबाज प्रयत्नांमुळे प्राणिसंग्रहालयास ऊर्जितावस्था आली. संग्रहालयाच्या सुधारित आराखड्यानुसार वाघ, सिंह, साप, मगरीचे पिंजरे नव्याने उभारले आले आहेत. पण, त्यास संरक्षक भिंतीची गरज आहे. उपद्रवी लोकांकडून उद्यानातील वस्तूंच्या चोरीचे प्रकार घडतात.