आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त भारती विद्यापीठ व ड्रीम फाउंडेशनच्या वतीने ‘व्यवस्थापनातून ग्रामविकास’ या कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण सोलापूर राजूर येथे एमबीए आणि एमसीएचे विद्यार्थी तीन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आला. अभिनव जनजागर उपक्रमांचे स्वागत माजी सरपंच सुभाष देवकते यांनी स्वागत केले. अशोक देवकते यांनी आभार मानले.
घरोघरी जाऊन जनजागृती
उद्घाटनानंतर एमबीएच्या 40 विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन कु टुंबांची माहिती घेतली. यामध्ये जलसंधारण, शेती विकास, युवाजागृती, महिला विकास, व्यसनमुक्ती, अंधर्शद्धा निर्मूलन, गावातील युवकांना स्वयंरोजगार, संगणक साक्षरता आदी विषयांवर मुलांनी गावकर्यांशी चर्चा केली.
मनपातर्फे अभिवादन
रेल्वेस्टेशन परिसरातील महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनपातर्फे अभिवादन करण्यात आले. गांधी पुण्यतिथी प्रार्थना सभेत महापौर अलका राठोड, उपमहापौर हारून सय्यद, सर्वधर्मिय धर्मगुरू उपस्थित होते. ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीतराम,’ ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ तसेच विविध भाषांतील गीते व भजन सादर करण्यात आले. या वेळी धर्मगुरू चंदनशिवे, र्शाविका संस्थेतील विद्यार्थिनी, शिक्षक, कुंठोजीमठ सु. रू. हिरेमठ, गंगाताई कोंपे, क्रांतिकुमार रमेश, सौ. एखंडे, पद्मशाली पुरोहित संघाचे पदाधिकारी, गायक मंडळी, रामशास्त्री म्याना, र्शी. गायकवाड, पी. पी. दंतकाळे, ज्ञानेश्वर वाघमारे आणि सहकलावंतांनी अत्यंत सुरेख गीते सादर केली. या भजनसंध्येने स्टेशनचौक परिसर दुमदुमून गेला.
गांधी फोरमतर्फे अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य गांधी फोरमतर्फे गांधीजींच्या भजनाचा कार्यक्रम महात्मा गांधी पुतळा स्टेशन रोड येथे आयोजित केला होता. प्रथम महात्मा गांधी यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अलका राठोड, अध्यक्षस्थानी राज्य गांधी फोरमचे अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा व प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार निर्मला ठोकळ उपस्थित होत्या. तसेच माजी महापौर नलिनी चंदेले, आरीफ शेख, काँग्रेस महिलाध्यक्ष सुमन जाधव, माणिकसिंह मैनावाले, शिक्षण मंडळ सभापती व्यंकटेश कटके, पांडुरंग चौधरी, नगरसेवक सुशीला आबुटे, हेमा चिंचोळकर, वीणा देवकते, रुस्तुम कम्पेली, जगदीश मुनाळे, सातलिंग शटगार, प्रकाश शहा उपस्थित होते.
‘खेड्याकडे चला’चा संदेश
या वेळी विद्यार्थ्यांनी ग्राम विकासातून राष्ट्रविकास करण्यासाठी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला. जलसंधारण, ग्रामविकास आराखडा आणि समूहशेती याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शनही करण्यात आले. यामध्ये सकाळी सहा वाजता ग्रामस्वच्छता, सात वाजता जनजागृती रॅली (पाणी वाचवा, मुली वाचवा, शौचालयाचा वापर करा) यावर प्रबोधन करण्यात आले. सकाळी दहा वाजता माजी दुग्धविकास मंत्री आनंदराव देवकते यांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी सरपंच विजया देवकते, हणमंतराव बिराजदार, कृष्णाप्पा बिराजदार, मुख्याध्यापक बी. जी. जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.