आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला महोत्सव शुक्रवारपासून, "झी मराठी'चे राया-प्रांजल यांचे आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - आरएनएइव्हेंट्सच्या वतीने होम मैदानावर १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता महोत्सवाचा प्रारंभ महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती इव्हेंट्सच्या संचालिका राही आरसीद यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी वाजता मेकअप स्पर्धा, मेहंदी स्पर्धा होणार आहे. शनिवारी पाककला स्पर्धा आणि होम मिनीस्टर स्पर्धा होणार आहे. रविवारी उखाणा, निबंध लेखन या स्पर्धा होतील तर सायंकाळी एकलनृत्य युगलनृत्य स्पर्धा होणार असल्याची माहिती आरसीद यांनी पत्रपरिषदेत दिली.
या महिला महोत्सवामध्ये विविध प्रकारचे ७० स्टॉल्स असणार आहेत. शिवाय महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला मंडळांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तसेच विविध गुणदर्शन स्पर्धा, आोग्यविषयक माहिती, तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आदी उपक्रमांचा समावेश असणार आहे. सर्व स्पर्धांकरिता स्पर्धकांनी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक असून, महोत्सवामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन आसावरी सराफ यांनी केले आहे. या वेळी विद्या मणुरे, शैलजा पुजार आदी उपस्थित हाेते.
तीन दिवसीय महिला महोत्सवात होस्ट म्हणून संकर्षण यांची उपस्थिती असणार आहे. शुक्रवारी सेलिब्रिटींशी गप्पा-टप्पा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये झी मराठी वाहिनीवरील राया-प्रांजल अर्थातच तन्वी पालव निरंजन कुलकर्णी यांचा सहभाग असेल. ही जोडी अनुभव कथन करेल.