आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Make In Solapur: Municipal Corporation Give Concession To Industry Gudewar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेक इन सोलापूर: शहरातील उद्योगांना मनपा सवलती देणार - आयुक्त चंद्रकांत गुडेवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातउद्योग यावेत यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे मदत करत आहे. उद्योग आले तर तरुणांना रोजगार मिळेल आणि विकासाला हातभार लागेल, ही भूमिका महापालिकेची आहे. नव्याने येणा-या सेवा क्षेत्रामधील उद्योगांना महापालिका सवलत देणार आहे. बांधकाम वापर परवाना दिल्यानंतर पाच वर्षांनी कर आकारणी करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली.
‘मेन इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’नंतर ‘मेक इन सोलापूर’ ही संकल्पना पुढे येत असून, त्यासाठी राजकीय आणि उद्योगपतींकडून प्रतिसाद मिळाल्यास महापालिका एक पाऊल पुढे येत यासाठी पुढाकार घेईल. याबाबत आयुक्त गुडेवार म्हणाले, “महापालिकेकडून आवश्यक असलेले परवाने देण्यासाठी फाइल लवकरच निकाली काढण्यात येतील. शहरात रासायनिक उद्योग असू नयेत, ते शहराबाहेर असावेत, सेवा क्षेत्रातील उद्योग आल्यास त्यांना बांधकाम परवानगी देण्यात येईल. ते पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांनी कर आकारणी करेल. याबाबत महापालिकेने आपले धोरण स्पष्ट केले आहे. याचा फायदा ‘दिव्य मराठी’ने राबवलेल्या ‘मेक इन सोलापूर’ संकल्पनेकरिता होईल.”

कंपनीसाठी सिटीबस देता येईल
महापालिकापरिवहन उपक्रमाकडे व्हॉल्वो सिटी बस असून, कंपन्यांनी मागणी केली तर व्हाॅल्वोसह अन्य सिटी बस सेवा सवलत दरात कंपनीला देण्याचा विचार प्रशासन करेल.

उद्योगांच्या पाण्याचा प्रश्नही मिटेल
उद्योगांनापाण्याची गरज आहे. आताची स्थिती पाहता शहराला पिण्यास पाणी नाही, तर उद्योगांना कसे देणार, असे विचारले असता, श्री. गुडेवार म्हणाले की, शहरात आता उद्योग उभारणी सुरू केले तर त्यास कालावधी लागेल. त्यांना बांधकामासाठी आवश्यक तितके पाणी उपलब्ध करून देता येईल. त्यानंतर पिण्यासाठी आणि इतर बाबींसाठी आवश्यक असणारे पाणी महापालिकेकडून देता येईल. उजनी जलाशय ते सोलापूर ही नवीन जलवाहिनी महापालिका टाकणार असून, त्याच्या जॅकवेलच्या कामासाठी टेंडर प्रसिध्द झाले आहे. जलवाहिनी आणि इतर कामाचे टेंडर लवकरच प्रसिध्द करणार आहोत. त्यामुळे आगामी काळात पाण्याची अडचण येणार नाही. आता इच्छाशक्तीची गरज आहे.