आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंब्यातील मुरूम उपसा पथकाला दिसला नाही!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माळढोक पक्षी अभयारण्याच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील परिक्षेत्रातून बेकायदेशीरपणे मुरूम उपसलेल्या जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पण, कारंबा परिसरातील वनजमिनीतून उचलण्यात आलेल्या मुरूमाच्या मोजणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मोजणीनंतर प्रत्यक्ष कारवाईचा बडगा केव्हा उगारणार याकडे लक्ष आहे.

उत्तर सोलापूर तालुक्याल कोंडी, अकोलेकाटी, कारंबा परिसरातील वनजमिनीतून एका ठेकेदाराने बेकायदेशीर पद्धतीने मुरुमाचा उपसा केला. त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले होते. गेल्या आठवड्यापासून भूवैज्ञानिकच्या कोल्हापूर उपविभागातर्फे टोटल स्टेशन मशीनतर्फे मोजणी करण्यात आली. त्यामध्ये कोंडी-गुळवंची रस्ता, अकोलेकाटी शिवारातील मुरूम उपसलेल्या सुमारे 250 एकर जमिनीची मोजणी झाली. कारंबा शिवारातील मोजणीकडे मात्र संबंधित पथकाचे दुर्लक्ष झाले. आदेशानंतरही वन अधिकार्‍यांना डावलले : मुरूम उपसलेल्या जमिनी माळढोक अभयारण्याच्या परिक्षेत्रातील असल्याने वनविभागाच्या अधिकार्‍यांना त्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी गेल्या आठवड्यात तहसीलदार अंजली मरोड यांना दिला होता. पण, महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी वनविभागाला डावलून जमिनीची मोजणी प्रक्रिया उरकण्यावर भर दिला.

अहवाल 15 दिवसांनी येईल
जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल भूजवैज्ञानिक विभागाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून 15 दिवसांनी मिळेल. यंत्राद्वारे खूपच बारकाईने मोजणी झाली आहे. .
- शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी