आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नान्नजला आले 3 नवे माळढोक, संख्या 5 वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - समस्त माळढोक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील अतिसंकटग्रस्त पक्ष्यांच्या प्रजातीत समाविष्ट असलेले तीन नवे माळढोक पक्षी आश्चर्यकारकरीत्या नान्नज अभयारण्यात वास्तव्याला आले आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च ते जूनअखेर या काळात माळढोक पक्षी दिसत नाहीत. अभयारण्यातून माळढोक नेमके जातात कुठे, या बाबत गेल्या काही वर्षांपासून संशोधन सुरू आहे. पण, त्यास अद्याप यश आले नाही. असे असताना यंदा याच काळात तीन माळढोक पक्षी अभयारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून नान्नजच्या अभयारण्यातील माळढोक पक्षांची सातत्याने घट होत होती. त्यामुळे वन्यजीव विभागासह पक्षीप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या गणनेत फक्त तीनच माळढोक आढळले होते. त्यामध्ये एक नर दोन माद्यांचा समावेश होता. त्यापैकी नर हा जानेवारी महिन्यांत अभयारण्यातून स्थलांतरीत झाला. पण, दोन्ही माद्या अभयारण्याच्या परिक्षेत्रातच होत्या.

यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात दोन नवे माळढोक अभयारण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून निरीक्षण सर्व्हेक्षण करणारे वन्यजीव कर्मचारी अभ्यासकांनी त्या पाहुण्यांना चटकन आेळखले. चार-दोन दिवसांनी पुन्हा ते निघून जातील, असा अंदाज अभ्यासक वन्यजीव विभागाचा होता. पण, सर्वांचे अंदाज फोल ठरवत त्यांनी नान्नजमध्ये राहणे पसंत केल्याचे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर करण्यात आलेल्या विशेष निरीक्षणातून स्पष्ट झाले. दोन नवीन नर माळढोकांमध्ये एक प्रौढ दुसरे कुमार अवस्थेतील आहे.

त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात आणखी एक मादी माळढोक पक्षी आढळला. त्याचे निरीक्षण अभ्यासकांकडून सुरु आहे. सध्या अभयारण्यातील माळढोक पक्ष्यांची संख्या पाच झाली आहे.

तो नर अद्याप परतला नाही
गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात आढळलेला अभयारण्यातील प्रमुख नर (अल्फामेल) माळढोक जानेवारीमध्ये स्थलांतरीत झाला. अद्यापही तो अभयारण्यात परतला नाही. नव्याने तीन पक्षी आले. पण, पूर्वीचा पक्षी अद्याप आला नाही. सध्या पडत असलेला अवकाळी पाऊस बदलत्या वातावरणामुळे तो लवकरच अभयारण्यात येईल, अशी आशा अभ्यासकांनी व्यक्त केली.

झाडे काढताच आकर्षिले
गंगेवाडी(ता. दक्षिण सोलापूर) येथील राखीव वनक्षेत्रातील माळरानावर पूर्वी सातत्याने माळढोकांचा वावर होता. पण, राखवी वनांमधील ग्लिरीसिडियांची झाडं वाढल्याने माळढोकांचा तेथील वावर कमी झाला. तसाच, प्रकार नान्नज अभयारण्याच्या परिसरात होता. दोन वर्षांपूर्वी गंगेवाडीचे राखीव वनक्षेत्र माळढोक अभयारण्यात समाविष्ट करण्यात आले. अभ्यासकांच्या सर्वेक्षणात गंगेवाडीतील ती झाडे काढल्यास पुन्हा माळढोक परततील, असे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यानुसार वन्यजीव विभागाने तेथील झाडे काढण्यास सुरवात केली. माेकळ्या जागेवर गवत वाढल्याने माळढोक त्या भागात आकर्षिले.

सुखद दिलासादायक
संख्या कमी होत असताना ते पुन्हा परतले ही सुखद दिलासादायक घटना आहे. दीड महिन्यांपासून त्याचे सर्व्हेक्षण सुरू असून आणखीही काही पक्षी परतील, अशी अपेक्षा आहे. सुनीललिमये, मुख्य वनसंरक्षक,

आलेल्या माळढोकांनी येथील अधिवास कायम ठेवला आहे. तसेच, नर-मादी एकत्र आल्याचे आढळले असून त्यांच्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र पिंजरे उभारणे सुरू आहे. राजेंद्रनाले, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक