आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा घुमला ‘हर्र बोला हर्र’चा गजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पांढरी बाराबंदी घातलेले नंदीध्वजधारक सेवेकरी, ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला’चा गजर, नाशिकहून आणलेल्या ढोलचा दणदणाट आणि ताश्यांच्या कडकडाटात श्रीशैलम् येथून आलेल्या श्रीमल्लिकार्जुन आणि भ्रमरांबिका विश्वकल्याण रथोयात्रेचे स्वागत झाले. बुधवारी सकाळी दहा वाजता रथयात्रा शहरात दाखल झाली आणि जोडबसवण्णा चौक येथून सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली. रथयात्रा मिरवणुकीत शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. अक्कलकोट रस्त्यालगच्या एसव्हीसीएस प्रशालेतून सकाळी पावणेदहा वाजता रथ शहराकडे मार्गस्थ झाला. श्री दानम्मा देवी भक्त मंडळ ट्रस्ट आणि महालक्ष्मी मंदिरच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. रथ 26 फूट लांब व 16 फूट उंच होता. या रथात श्रीशैलच्या श्रीमल्लिकार्जुन, माता भ्रमरांबिका व श्रीगणेश यांची श्रीशैल येथील प्रतिकात्मक मंदिरे होती. रस्त्यावरील दृश्य गड्डा यात्रेतील नंदीध्वज मिरवणुकीप्रमाणे दिसत होते.

विश्वकल्याणच्या हेतूने निघालेल्या या रथयात्रेचे आगमन होताच आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, विजयकुमार देशमुख, महापौर अलका राठोड, माजी आमदार शिवशरण पाटील, श्री श्री श्री 1008 डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी (श्रीशैलपीठ), तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य, वीरभद्र शिवाचार्य, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, रेणूक शिवाचार्य, श्रीकंठ शिवाचार्य, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, संयोजक अनिल सिंदगी यांच्या उपस्थितीत रथाचे पूजन करण्यात आले.

नंदकुमार मुस्तारे, राजशेखर हिरेहब्बू, तम्मा मसरे, विश्वनाथ जोकारे, शिवलिंग माळगे, सिद्धय्यास्वामी हिरेमठ, मल्लिकार्जुन वाकळे, चिदानंद वनारोटे, बाबूराव नष्टे, अँड. एम. एम. राचेटी, अँड. धानय्या चिवरी, काशिनाथ दर्गोपाटील, सोमशंकर देशमुख, सिद्धाराम चाकोते, गुरू म्हेत्रे, पुष्पराज काडादी, आनंद हब्बू, आनंद मुस्तारे, चिदानंद मुस्तारे, नगरसेवक उदयशंकर चाकोते, आनंद चंदनशिवे, सिद्धारूढ निंबाळे, सिद्धेश्वर मुनाळे, असिम सिंदगी, नरेंद्र गंभीरे, अँड. आर. एस. पाटील, बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्वर बमणी, ए. जी. पाटील, श्रीशैल बनशेट्टी, सिद्धेश्वर मुनाळे, सर्व धार्मिक संघटना, ज्ञाती संस्था, गणेशोत्सव तसेच नवरात्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पायघड्या व सुहासिनींच्या फुगड्या
चाटी गल्ली, माणिक चौक, अक्कलकोट नाका आणि शहरातील प्रमुख चौकांत रथयात्रा आणि जगद्गुरूंच्या स्वागतासाठी रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, तर सुहासिनीही आनंदून फुगड्या घालत होत्या.