आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषणाचे व्हावे उच्चाटन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-सोलापूर जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण जरी कमी असले तरी राहिलेल्या कुपोषित मुलांसाठी कार्य करावे, अशा विद्यार्थ्यांना चांगला पौष्टिक आहार देऊन सुदृढ करावे, कुपोषणाचे समूळ उच्चाटन करावे, असे आवाहन पालकमंत्री दिलीप सोपल यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका पुरस्कार पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीपक साळुंखे, दिलीप माने, सिद्रामप्पा पाटील, बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शिवाजी कांबळे, जालिंदर लांडे, शिवानंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंगल यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री सोपल म्हणाले, ‘शासनाकडून मुलांच्या संगोपनासाठी विविध योजना राबवत आहे. त्या राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. अंगणवाडी सेविकांनी गरीब मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढ होण्यावर भर द्यावा. सध्या समाजात रूढी, परंपरा आजही प्रचलित आहे. हिमोग्लोबिन वाढीसाठी पौष्टिक आहार दिला तर पुढील पिढी सदृढ होईल.’