आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंद्रूपचा पाणी प्रश्न सोडवू, खासदार बनसोडे यांचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंद्रूप येथील सीताबाई तलावाची पाहणी करताना खासदार शरद बनसोडे आदी. - Divya Marathi
मंद्रूप येथील सीताबाई तलावाची पाहणी करताना खासदार शरद बनसोडे आदी.
दक्षिण सोलापूर - मंद्रूपगावाला पाणीपुरवठा करणारी नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजना गावालगतच्या दोन्ही तलावात उजनी कालव्यातून पाणी सोडून, पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सांगितले.
खासदार बनसोडे यांनी नुकतीच मंद्रूप गावाला भेट देऊन पाण्याची समस्या जाणून घेतली. या वेळी ज्येष्ठ नेते गोपाळ कोरे, उपसरपंच रमेश नवले यांनी त्यांना गावच्या पाणीप्रश्नाची रखडलेल्या सुधारित पाणी योजनेची माहिती दिली. तसेच सीताबाई तलाव गावतलावात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी बनसोडे यांच्याकडे केली.

खासदार बनसोडे यांनी गावाजवळच्या दोन्ही तलावाची पाहणी केली. तसेच क्रीडा संकुल गावातील पाणीप्रश्न जाणून घेतला. खासदार बनसोडे यांनी तलावात उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाशी बोलून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच सुधारित पाणीपुरवठा योजना कशी लवकर मार्गी लागेल, यासाठी संबंधितांना कार्यवाही करण्यास पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या वेळी भारतीय जनता पक्षाचे शिवपुत्र जोडमोटे, विशाल केवटे, शिवानंद लोभे, भगवान सुतार, महेश मायकाळे, चिदानंद ख्याडे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...