आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manglagour Maharashtra Women's Festival In Shrawan Month

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाटण्याच्या भांडणात का गं सवती माझा लॅपटॉप घेतला तू, आधुनिकतेने सजली मंगळागौर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘आगोटे पागोटे, गाठोड, कमळ, बस खुर्ची फुगड्यांचे विविध प्रकार, होडी, खिस बाई खिस दोडका खिस, तिखट मीठाचे पोहे कशाला, मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते जरीची साडी घेईन म्हणते’ अशा मंगळागौरीच्या अनेक पारंपरिक खेळाच्या प्रकारात नव्या खेळांची सांगड व नव्या विचारांची पेरणी करण्यात आली. मधुश्री शारदीय मंचच्या वतीने मंगळागौरीसाठी अष्टपैलू खेळांचे सादरीकरण केले. गणराज मंगल कार्यालयात आयोजन केले होते.

‘लाटण्याच्या भांडणात का गं सवती माझा लॅपटॉप घेतला तू, का गं सवती माझा मोबाइल घेतला तू’ हे गीत तर ‘सुपाचे गाण्याला या पार्लरची त्या पार्लरची हेअर ड्रेसर नाही आली नाचु मी कशी,’ अशा प्रकारचे गाणे सादर केले. फुगड्यांमध्ये तीन वर्षांच्या र्शेया दीक्षितची फुलपाखरू ही फुगडी सादर केली तर अग्गोबाई ठग्गोबाईच्या गाण्यावर नारळाच्या करवंटी हाती घेऊन समूहनृत्य सादर केले.