आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्यतृतीयेमुळे आंब्याची दिवाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या आंब्यांची आवक झाली आहे. तसेच काही जातीवंत आंब्यांचे दर जास्त असल्याने सर्वसामान्यांनी देशी आंब्यांवरच अक्षय्यतृतीया साजरी करण्याचा मानस केल्याचे चित्र आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सातरस्ता, विजापूर रस्ता, आसरा चौक, जुळे सोलापूर आदी भागात किरकोळ व ठोक विक्रेत्यांनी दुकाने थाटत आंब्यांची विक्री केली. साध्या देशी आंब्याचे दर प्रति डझन 60 ते 80 रुपये होते. तर जातीवंत देवगड हापूस, रत्नागिरी हापूस यांना कमी मागणी असली तरी तो घेणारा ठरावीक ग्राहकवर्ग त्याचीच चौकशी करत होता. 300 ते एक हजार रुपये असे याच्या प्रति डझनाचे दर होते. कापून खायचे तोतापुरी तसेच छोटे गोटी आंबेही बाजारात दाखल झालेले असून, याचे दर 40 ते 60 रुपये डझन होते.