आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manodherya Scheme For Victim By Maharashtra Government

पीडित महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुष्कर्म, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अँसिड हल्ला आदींतील पीडित महिलांना मानसिकदृष्ट्या आधार देण्यासाठी राज्य सरकारने मनोधैर्य योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या आर्थिक बाजूचा विचार मुख्यत्वे होणार आहे. पीडित महिलेस किमान 15 दिवसांत आर्थिक मदत मिळणे, तिचे समुपदेशन करण्याचे काम या योजनेत आहे. किमान दोन लाखांची तर कमाल तीन लाखांची मदत केली जाणार आहे.

असा मिळेल योजनेचा लाभ
राज्यात 2 ऑक्टोबरपासून ही योजना त्वरित लागू होणार आहे. दुष्कर्म, बालकांवरील लैंगिक अत्याचार या प्रकरणी नुकसान झालेल्या महिलांच्या मनोधैर्यासाठी म्हणून दोन लाख रुपयांची शासकीय मदत मिळणार आहे. तर अँसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये व अँसिड हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास 50 हजार रुपयांची पंधरा दिवसांच्या आत मदत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

समुपदेशनाचाही देणार आधार
केवळ महिला व युवतींना आर्थिक मदत करून कर्तव्य पार पाडणे एवढाच उद्देश नसून त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. यात सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या समुपदेशकांचाही समावेश करण्यात येणार आहे.

अंमलबजावणी महत्त्वाची
सरकारच्या अनेक योजना येतात. त्यातल्या काही चालतात काही नाही. मात्र, ही महिलांसाठी खूप विचार करून सुरू केलेली योजना आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे. हे महत्त्वाचे आहे. त्यातही काही गैरप्रकार घडू नयेत. ते सरळ मार्गाने पीडित महिलांना मिळावेत असे वाटते.
- सीमा किणीकर, सामाजिक कार्यकर्त्या