आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अागामी गाळप हंगाम सुरू करण्यात अडथळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - साखरेच्या दरातील प्रचंड घसरणीमुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. मागील कर्जावरील व्याज हप्ते फेडण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नसल्याने त्यांची बँकांमधील खाती अनुत्पादक वर्गवारीत जाणार आहेत. त्यामुळे कारखान्यांना येणारा (२०१५-१६) गाळप हंगाम सुरू करण्यासाठी अडथळे निर्माण होतील, असे मत राज्य साखर संघाचे अध्यक्ष, खासदार विजयसिंह मोहिते यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने संपलेल्या गाळप हंगामातील उसाला एफआरपीनुसार दर देण्यासाठी साखर कारखान्यांना सहा हजार कोटींचे कर्ज देण्याचा अध्यादेश २३ जून रोजी काढला. तसेच या कर्ज परतफेडीचे स्वरूप जाहीर केले. त्यासंदर्भात ते 'दिव्य मराठी'शी बोलत होते. मोहिते म्हणाले, एक वर्षाच्या व्याज परताव्यावर आधारित सुमारे सहा हजार कोटी रुपये बँकांकडून साखर कारखान्यांना उपलब्ध होणार आहेत. परंतु उर्वरित ऊस बिल देयके कोठून द्यायची, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
बातम्या आणखी आहेत...