आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Train Root Chang Due To Accident Near Aardaki Railway Station

सोलापूरकडे येणाऱ्या गाड्यांना होतोय उशीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सातारा येथील आर्दकी रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी मालगाडीच्या १६ वाघिणी रुळावरून घसरल्यामुळे रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या कुर्डुवाडीमार्गे वळवल्यामुळे पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या गाड्यांना थोडासा उशीर होत आहे.

बुधवारी सोलापूरला पोहचण्यास इंद्रायणी एक्स्प्रेसला २७ मिनिटांचा उशीर झाला. तर दुपारी वाजून ५० मिनिटांनी येणारी पुणे - सोलापूर पॅसेंजर रात्री च्या सुमाराला सोलापूरला आली. या शिवाय दादर -मद्रास एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई -नागरकोईल, चेन्नई सुपर, कुर्ला -कोईम्बतूर एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस या गाड्यांना २० ते ४० मिनिटांचा उशीर झाला. रेल्वे प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले असले तरी रेल्वेची सेवा पूर्वपदावर येण्यास आणखी काही तासांचा विलंब लागणार आहे.

या गाड्यांचे मार्ग बदलले

सातारा येथील रेल्वेच्या दुर्घटनेमुळे गांधीनगर - बंगळुरू, यशवंतपूर- निजामबाद, चंदीगड -यशवंतपूर एक्स्प्रेस, कुर्ला -हुबळी एक्स्प्रेस , दिल्ली - वॉस्को एक्स्प्रेस, धनबाद -कोल्हापूर एक्स्प्रेस, बेंगळुरू-अजमेर ,यशवंतपूर -हजरत निझामुद्दीन, मुंबई -कोल्हापूर, दादर -तितीकाेरिन, आदी गाड्या सातारा-मिरजऐवजी कुर्डुवाडीमार्गे धावत होत्या.

गाड्यांचे मार्ग बदलले
साताराजवळ झालेल्या अपघातामुळे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. याचा थोडासा परिणाम सोलापूरकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर झालेला आहे.” के.व्ही. थॉमस, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर