आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Community And MIM Agitate For Muslim Reservation

मुस्लिम आरक्षणासाठी मराठा समाज, एमआयएम रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यात एकाच वेळी लागू करण्यात आलेल्या मराठा मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर करताना भाजप, शिवसेना सरकारने मुस्लिम आरक्षणाचे विधेयक मांडले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन मंगळवारी दुपारी अकरा वाजता ऑल इंडिया मजलिस ईत्तेहाद उल मुसलिमीन (एमआयएम) आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष रमेश गावढे, जिल्हा प्रभारी तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी तौफिक शेख, रमेश गावढे, मुफ्ती इब्राहिम साहब, शफी हुंडेकरी, इम्तियाज अल्लोळी, इसाक पुढारी, काेमारो सय्यद, इफ्तेकार तुळजापुरे, उमेर नाईकवाडी, दौला कुमठे आदी प्रमुख उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड
मुस्लिमसमाजाला पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीकरिता छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी दुपारी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी फारुख शेख, राजअहमद शेख, राम गायकवाड, लता ढेरे, रसूल शेख, साहेरा शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुस्लिम समाजास रद्द केलेले पाच टक्के आरक्षण तत्काळ लागू करावे, अशा मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

विधानसभेत झाले होते भेदभाव : मराठासमाजासाठी आरक्षणाची तरतूद असलेले विधेयक विधानसभेत २३ डिसेंबर रोजी मांडून एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र त्याचवेळी मुस्लिम आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले नाही.