आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Reservation Report Will Be On 28 February Narayan Rane

मराठा आरक्षण अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत देणार - नारायण राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - मराठा आरक्षणाचा अहवाल येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. हा अहवाल तयार करताना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्व बाबींचा विचार केला जात आहे. या मध्ये उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयदेखील महत्त्वाचे आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री व आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी गुरुवारी दिली.
एका कार्यक्रमानिमित्त पंढरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणे म्हणाले, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे शासन आहे त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री हे नियमाप्रमाणे काम करीत आहेत त्यामुळे निर्णय उशिरा होतात असे म्हणणे चुकीचे आहे. वीज दर कपातीसंदर्भात जो अहवाल शासनाला दिला आहे त्यात 10 आणि 20 टक्के असे दोन पर्याय ठेवलेले आहेत. राज्याला जेवढा भार उचलणे शक्य आहे तेवढा भार उचलावा.असे यात आपण सुचविले आहे.
‘आप’चा परिणाम नाही : महाराष्ट्रात ‘आप’ची जादू चालेल का, या प्रश्नावर राणे म्हणाले, ‘आप’ची जादू फक्त दिल्ली मध्येच चालणार आहे. या पक्षाचा इकडे काही संबंध नाही. उत्तरेकडेचे कोणतेही वार आपल्याकडे चालत नाही. त्यामुळे आपल्या राज्यात आपला यश मिळणार नाही.
महायुती म्हणजे भाराभर चिंध्या : महायुतीबाबत बोलताना राणे म्हणाले, महायुती म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत आहे. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषदेत काँग्रेसचेच वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फारसा दिसत नाही. त्यामुळे आमच्यामध्ये वादाचा प्रश्नच येत नाही असे राणे म्हणाले.