आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maratha Samaj Seva Mandal Construct Shop Remove Notice Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा समाज सेवा मंडळाने बांधलेले गाळे तत्काळ पाडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माजी महापौर व नगरसेवक मनोहर सपाटे अध्यक्ष असलेल्या मराठा समाज सेवा मंडळ संचलित शिवछत्रपती हायस्कूललगत बांधलेले बेकायदेशीर गाळे तत्काळ पाडून टाकण्याचा आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नगर अभियंता सुभाष सावस्कर यांना दिला आहे.

या संदर्भात निराळे वस्ती येथील लक्ष्मण साठे यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी करून आयुक्तांनी गुरुवारी आदेश दिले. या गाळ्यांच्या बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेतली नव्हती. फेब्रुवारीमध्ये हे गाळे खुले करण्याचा प्रयत्न झाला, पण बांधकाम परवाना नसल्याने ते गाळे अजूनही वापरात आलेले नव्हते.

सध्या महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बेकायदेशीर बांधकामांविरुध्द मोहीमच उघडली आहे. त्याची सुरुवात त्यांनी महापालिकेतील अधिकार्‍यांपासून केली आहे. नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्या घरचाच बांधकाम परवाना आहे की नाही याची माहिती मागविली होती. त्यानंतर त्यांनी आता नगरसेवकांकडे लक्ष वळविले आहे. सपाटे यांनी यापूर्वीही बांधकाम पाडण्याच्या आदेशाला महापालिकेला आव्हान दिलेले होते.

फेर आदेशानंतर आता कारवाईची प्रतीक्षा आहे. या बांधकामासंदर्भातील फाइल आजही लवकर उपलब्ध होत नव्हती, पण आयुक्तांनी दणका दिल्यानंतर चार तासांत फाइलही हजर झाली आणि कारवाईचे आदेशही झाले. आता नगरअभियंता काय करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष राहणार आहे


नगर अभियंत्यांना आदेश
नगर अभियंता सुभाष सावस्कर यांना आदेश देऊन तत्काळ ही कारवाई करावी व पाच गाळे पाडून टाकावेत, असे आदेश दिले आहेत.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त , मनपा

आयुक्तांनी आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे
शिवाजी शाळेच्या कम्पाउंडलगत आम्ही गाळे बांधले आहेत. हे बांधकाम संस्थेच्या 1989, 90, 94 व 2000 वर्षाच्या बांधकाम परवान्यात नमूद केलेले आहे. हे एक्झिस्टिंग बांधकाम असल्याने बेकायदेशीर म्हणता येणार नाही. तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर यांच्याकडे आम्ही या संदर्भातील खुलासाही सादर केला आहे, त्यावर त्यांनी कोणताच निर्णय दिला नाही. आताचे आयुक्त गुडेवार यांनी आमची कोणतीच बाजू न ऐकता गाळे पाडण्याचे आदेश दिल्याचे समजते. आयुक्तांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे मगच गाळे पाडण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा अशी माझी मागणी आहे. गेल्या सात, आठ महिन्यांपूर्वी आम्ही न्यायालयातही धाव घेतली आहे. तेथे दुरुस्ती नकाशे सादर केले आहेत. महापालिकेने आमच्या बाजूलाच फ्रंट मार्जिनमध्ये गाळे बांधले आहेत असे असताना आमचे गाळे बेकायदेशीर कसे ?’’ मनोहर सपाटे, माजी महापौर