आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मराठा मंडळा’ची निवडणूक जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. पदाधिकारी व कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी 4 जून 2014 रोजी मतदान होईल. रविवारी मंडळाची सर्वसाधारण सभा झाली. तीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड. अप्पाराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मंडळाच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलात होणार आहे. मतदान आणि मतमोजणीही याच संकुलातील दालनांमध्ये होईल. 4 जूनला सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत मतदान असून, दुपारी 3 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या संस्थेवर माजी महापौर मनोहर सपाटे यांचेच वर्चस्व आहे. त्यांच्या विरोधात कोण निवडणूक मैदानात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे. शहरात नुकतीच पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यानंतर मराठा समाज सेवा मंडळाची प्रतिष्ठेची समजली जाणारी ही निवडणूक होत आहे.