आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोगावच्या महिलांचा घागर मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर- वीज,पाणी, गटारीसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असणा-या भोगाव येथील महिलांनी बुधवारी उत्तर पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढला. या महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोरही आपले गाऱ्हाणे मांडले.
भोगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. वारंवार मागणी करूनही विजेचे खांब बसवले नसल्याने रात्री येथील नागरिकांना मोठा त्रास होतो. रस्ते, गटारांची सोय नाही. मागणी करूनही ग्रामपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे महिलांनी िनवेदनात म्हटले आहे.