आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशनामाचा गजर: गणपती घाट, आजोबा, कसबा, मशृम गणपती आदी ठिकाणी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पद्मशाली समाज कुलदैवत महर्षी मार्कंडेयांचा जन्मोत्सव शुक्रवारी मोठ्या जल्लोषात झाला. पूर्वभागातील चौकाचौकात प्रतिमांचे पूजन करण्यात आले. होमहवन करून महाप्रसाद देण्यात आला. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मार्कंडेय मंदिरात पालखी घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी समाजातील मान्यवर उपस्थित होते.

सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात सकाळी सहाला मूर्तीस महारुद्राभिषेक करण्यात आला. राजेंद्र म्याडम पूजेचे मानकरी होते. त्यानंतर ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पद्मपताका उंच गेल्यावर मार्कंडेयांचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर होमहवनाचा कार्यक्रम झाला. दुपारी बाराला पालखी घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सत्यनारायण गुर्रम, विश्वस्त भूमय्या येमूल, भूमय्या गड्डम, नागनाथ मुदगुंडी, प्रा. श्रीनिवास कोंडी, अजय दासरी, नागनाथ सोमा, हरिदास पोटाबत्ती, ज्ञानेश्वर म्याकल, पुरुषोत्तम पोबत्ती, श्रीनिवास िदड्डी, रघुरामुलु कंदिकटला, उमेश मामड्याल, व्यंकटेश कोंडी आदी उपस्थित होते.