आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marksvadi Communist Party Solapur News In Marathi

‘माकप’ सर्वात शेवटी उघडणार सोलापूरचा पत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महायुती, महाआघाडीला विरोध करणार्‍या डाव्या पक्षांनी सोलापूर मतदारसंघात अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. डाव्यांचे निमंत्रक आणि माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांनी 28 मार्चला सारे काही स्पष्ट करू, असे सांगितले. तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे सोलापुरात तिसर्‍या आघाडीची शक्यता मावळली असल्याचे स्पष्ट केले.

डाव्यांनी सातत्याने काँग्रेसची पाठराखण केली; परंतु अणुकरारावरून तीव्र मतभेद झाले. त्याच वेळी आता काँग्रेसला साथ द्यायची नाही, हेही ठरवून टाकले. भाजप-शिवसेना तर डाव्यांच्या दृष्टीने जातीयवादी पक्ष, अशा स्थितीत तिसरा पर्याय देण्याचे डाव्यांचे प्रयत्न असतात. मात्र, यंदा ही मोट बांधण्यात डाव्यांना यश आले नाही. सोलापुरात स्थानिक स्तरावर डाव्यांची भूमिका ठरत असते. त्यालाही यंदा विलंब होत असल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांनी आतताईपणा करून निवडणूक निकालात तोंडघशी पडले होते. तशी स्थिती पुन्हा ओढवून घ्यायचे नाही, याच दृष्टीने ही सावध पावले असल्याचे दिसून येते.
थेट भेट
मास्तर म्हणतात, आता काहीही बोलणार नाही!
प्रश्न : मास्तर, लोकसभा निवडणुकीत डाव्यांच्या भूमिकेकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
आडम : आमची भूमिका अद्याप ठरलेली नाही. नेते-कार्यकर्त्यांसमवेत बैठका सुरू आहेत.
प्रश्न : सोलापूर लोकसभा मतदारसंघापुरते तरी काही ठरवले असणार ना?
आडम : नाही. 27 मार्चला आमची अंतिम बैठक होईल. त्यानंतर 28 ला भूमिका जाहीर करू.
प्रश्न : तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपून जाईल.
आडम : जी काही चर्चा सुरू आहे, त्याबाबत आताच काही बोलणार नाही.