आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पती शंकर दिगंबर लिंबोळे व सासू निलाबाई दिगंबर लिंबोळे (रा. बुधवार पेठ, वडारगल्ली) अशी त्यांची नावे आहेत. रेणुका शंकर लिंबोळे (वय 20) या विवाहितेला माहेरून सोने व पन्नास हजार रुपये आणण्याचा तगादा लावला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाणही केली. 27 मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती शंकर लिंबोळे यांनी रेणुका हिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि निलाबाई लिंबोळे यांनी पेटवून दिले. यामध्ये रेणुका ही भाजून गंभीररीत्या जखमी झाली. तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.