आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठे कलावंत होण्यासाठी स्वत:ची वेगळी शैली हवी - मृण्मयी देशपांडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्याला मोठे कलावंत होण्यासाठी स्वत:ची अशी एक वेगळी शैली हवी त्या शिवाय तुमचे वेगळेपण सिध्द होत नाही असे मत कुंकू मालिका फेम अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.

शुक्रवारी जनसेवा संघटनेच्या वतीने छत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित केलेल्या प्रतापसिंह मोहिते- पाटील सांस्कृतिक महोत्सवात शोभा बोल्ली यांनी देशपांडे यांची प्रकट मुलाखत घेतली. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, प्रमुख पाहुणे म्हणून रंगपरिनिरीक्षण मंडळाचे शिवानंद चलवादी व प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे उपस्थित होते.

या वेळी मृण्मयीने आपल्या कॉलेजच्या दिवसापासून एकांकिकेचे प्रयोग, नाटक, नृत्याचा सराव आणि या सगळया चंदेरी दुनियेचा धावपळीचा प्रवास कसा आहे याचा उलगडा केला. या वेळी त्यांनी आपले आजी-आजोबा कलावंत असल्याने आपल्यात हे गुण जन्मताच आले आहेत असे सांगतिले. मात्र, काम करताना आपल्याला आपल्यातले वेगळेपण सिध्द करण्यासाठी काहीतरी करावे लागते, हे कौतुकाचे असायला हवे आणि ते करणे कष्टाचे व जिकीरीचे असते.

या वेळी ‘एकापेक्षा एक’ सेटवरच्या गप्पा, कुंकूच्या वेळी रात्रंदिवस झालेले काम, या सार्‍या गप्पांचा प्रवास रसिकांना मिश्किलपणे अनुभवण्यास मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता बोल्ली यांनी केले तर आभार मेरूद्दीन शेख यांनी मानले.
मृण्मयी सोलापूरची नात
मृण्मयी मूळची पुुण्याची असली तरी तिची आई प्रतिभा काणे सोलापूरच्या नाट्य आराधना संस्थेचे नाट्य कलावंत अरविंद काणे यांची नात आहे. तिचा जन्म सोलापूरचा असून आई प्रतिभा ही नाट्य कलावंत आहे. पूर्वी सोलापूरच्या वास्तव्यास असलेल्या काणे कुटुंबाची मृण्मयी देशपोंडे ही नात आहे.

‘अग्निहोत्र’मध्ये प्रथम भूमिका
मृण्मयीने सातवीत असल्यापासून आपण नाटकात नृत्यात आणि वादनाचे शिक्षण घेत असे. त्यामुळे हा प्रवास तिच्यासाठी सवयीचा होता. मात्र, प्रथमच महाविद्यालयात गेल्यावर ‘पोपटी चौकट’ एकांकिकेचे दिग्दर्शन करून तिने मोठे यश प्राप्त केले. ते काम पाहून श्रीरंग गोडबोले यांनी तिला अग्निहोत्र मालिकेत काम दिले. पुढे राकेश सारंग यांच्या कुंकू मालिकेत ती जानकीच्या रूपाने पुढे आली.