आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाप कार्यवाह प्रदीप पायगुडे- घुमान साहित्य संमेलनाने पानिपत पराभवाची सल जरा कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सातशे वर्षापूर्वी संत नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले घुमान हे पंजाबातील तीर्थक्षेत्र बनले आहे. तेथे साहित्य संमेलनाचे आयोजन म्हणजे "पानिपत'च्या पराभवाची सल जरा कमी करणारे ठरले आहे, असे मत घुमान साहित्य संमेलनाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवस्मारक सभागृह येथे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे यांच्यावतीने १३ मे हा ८५ वा मार्शल लॉ दिनानिमित्त अभिवादन मसाप उत्तर सोलापूर शाखेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान आयोजिले होते. त्यावेळी पायगुडे यांनी "घुमान साहित्य संमेलन' या विषयावर व्याख्यान दिले.
अध्यक्षस्थानी माजी आमदार निर्मला ठोकळ होत्या. यावेळी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, डॉ. श्रीकांत येळेगावकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पायगुडे म्हणाले, इतिहास विसरून चालणार नाही, कारण यातूनच साहित्य निर्मिती होते. हा इतिहास भविष्य घडवत असताे. आपला पानिपत युद्धात पराभव झाला, ही सल आजही कायम आहे. घुमान येथे साहित्य संमेलनाचे नेटके आयोजन करून ही सल काही प्रमाणात तरी कमी झाली, असेच मला म्हणावेसे वाटेल. तब्बल साडेतीन हजार महाराष्ट्रीय पाहुण्यांचा आदर, सत्कार करून घुमानवासीयांच्या मोठ्या मनाचा प्रत्यय उपस्थित सर्वांना मिळाला.
गुरूग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथात संत नामदेवांच्या ६१ वचने कबिरांच्या १०० दोह्यांचा अंतर्भाव आहे. नांदेड ही भूमी शीख धर्मियांसाठी आदराची भूमी आहे. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील नाते जोडणारा हा इतिहास लक्षात ठेवून घुमानची निवड झाली. तेथे साहित्य संमेलन आयोजित केले गेले नसते तर तो करंटेपणाच ठरला असता. संत नामदेव यांच्यामुळे पावन झालेल्या या नगरीची महती काही औरच आहे. १९८० च्या दशकात जेव्हा पंजाब अशांत होता. तेव्हा अमृतसरपासून जवळ असलेल्या गावातून दहशतवादी वास्तव्यास होते. पण घुमानमध्ये त्यांनी पाऊल ठेवले नाही. या पवित्र भूमीचे इतके महत्त्व संत नामदेव महाराजांच्या वास्तव्यामुळे तेथील सर्वांच्या मनात राखले गेले आहे ते आजतागायत. महाराष्ट्रातून आलेल्या प्रत्येकाचा तेथे आदर केला जातो. पंढरपूर विठ्ठलामुळे, आळंदी ज्ञानेश्वरांमुळे, पैठण नाथांमुळे जसे ओळखले जाते तसे संत नामदेव महाराजांच्या बाबत महाराष्ट्रात नाही पण दूर पंजाबात घुमानमध्ये ते झाले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...आपण देशासाठी काय देणार महत्त्वाचे - डॉ. मालदार ....
बातम्या आणखी आहेत...