आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त साहेब, शहरात खुलेआम चालतो मटका, हे घ्या त्याचे पुरावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते, गल्ली-बोळांत थाटलेल्या टपर्‍या, पान दुकानांतून खुलेआम मटका सुरू आहे. सकाळी-संध्याकाळी ‘ओपन-क्लोज’वर लाखो रुपये लावले जातात. पण, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेतलेल्या पोलिसांना असा काही प्रकार सुरू असल्याचे माहीतच नाही. पोलिस आयुक्त म्हणतात, शहरात मटका सुरू नाही, असल्यास कारवाई करतो. पण, शहरात हा धंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यावर ‘दिव्य मराठी’ने टाकलेला हा प्रकाश.

शहरातील एमआयडीसी, जोडभावी पेठ, फौजदार चावडी, जेलरोड, सलगर वस्ती, विजापूर नाका, सदर बझार या पोलिस ठाण्याच्या माध्यमातून अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवले जाणे अपेक्षित आहे. शिवाय गुन्हे रोखण्यासाठी विशेष गुन्हे शाखा स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांपासून ते आयुक्तांपर्यंतची मोठी यंत्रणा असतानाही शहरात मटका व्यवसाय तेजीत आहे. विशेष म्हणजे गजबजलेल्या व्हीआयपी रस्त्यावरील टपर्‍या, पान दुकानांतून मटक्याचा व्यवसाय खुलेआम चालतो. ‘ओपन-क्लोज’च्या आकड्याची फलके उघडपणे लावलेली असतात. मटका लावण्यासाठी सकाळ-संध्याकाळ गर्दी या टपर्‍यांवर दिसते. दररोजच हे चित्र निदर्शनास येते. पण, पोलिसांच्या निदर्शनास या गोष्टी येत नाहीत.

काय सुरु आहे सोलापुरात? पोलिस आयुक्तांनाच थेट सवाल.. वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..