आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या हद्दीबाहेर मोबाइलने मटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मटका जुगार चालू ठेवण्यासाठी बुकीचालकांनी अनेक पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला पण शहर विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सारे प्रकार हाणून पाडले. यावर शेवटचा पर्याय म्हणून बुकीचालकांनी शहराच्या हद्दीबाहेर जाऊन मटका चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. हैदराबाद रोड आणि तुळजापूर रोडवर जाऊन मोबाइलवरून मटक्याची सूत्रे हलवली जात आहेत.

अशोक चौक, कुमठा नाका परिसरातून दररोज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ‘लाल रंगाची इनोवा’ ही चारचाकी गाडी निघते. या कारमध्ये चार जण बसलेले असतात. ही कार अक्कलकोट रस्त्यावरून हैदराबाद रस्त्यामार्गे शहर हद्दीच्या बाहेर जाते. हद्दीबाहेर एका खोलीत ते चौघे थांबतात. दुपारी अडीच ते रात्री नऊपर्यंत त्यांचा तेथेच ठिय्या असतो.

शहराबाहेर का?
शहर हद्दीबाहेरील खोलीत बसणार्‍या त्या चौघांकडे प्रत्येकी कमीत कमी चार ते पाच मोबाइल संच असतात. त्यावरून दिवसभर मटका घेण्याचे काम सुरू असते. असाच प्रकार तुळजापूर रोड येथील हगलुर गावाजवळ सुरू आहे. शहरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपले जाळे पसरवले आहे. त्यामुळे हद्दीच्या बाहेर मटका सुरू ठेवत आहेत.

तर नियंत्रण आणणे शक्य
ग्रामीण भागात पोलिसांची संख्या कमी असते आणि भौगोलिक परिसर मोठा असतो. त्यामुळे हे बुकी पोलिसांच्या हाती लागणे कठीण आहे. पोलिसांनी एकदा मनावर घेतले की अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात, याची प्रचिती सध्या शहरातील मटक्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईतून येत आहे. ग्रामीण पोलिसांनीही आपली यंत्रणा राबवली तर मटका कायमचा हद्दपार होऊ शकतो.

सायबर क्राइमची मदत घ्यावी
लाल रंगाची इनोवा कार ही शहर हद्दीतून निघताना शहर पोलिसांनी पाठलाग केल्याच रंगेहात पकडणे शक्य आहे.

बुकीचालक कोणाच्या पाठिंब्यावर पोलिसांना चॅलेंज करतायेत याचा माग काढणे शहर पोलिसांना सहज शक्य आहे.

सायबर क्राइमची मदत घेतल्यास मोबाइलवरील मटकाही पूर्णपणे बंद होणे शक्य होईल.