आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यनारायणाचा पारा चढला; उकाड्याने सोलापूरकर हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गेल्या काही दिवसांपासून कोपलेल्या सूर्यनारायणाचा पारा गुरुवारी किंचित उतरला. तापमान 43.5 इतके होते. बुधवारचे तापमान यंदाच्या मौसमातील सर्वाधिक 43.6 इतके नोंदले गेले होते. पाऊसमान कमी असल्याने जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा वाढत असल्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत. सकाळपासूनच तीव्रता जाणवू लागते आणि दुपारच्या वेळेस उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. सोलापूरकर पावसाची वाट अतुरतेने पाहात आहेत.

टळटळीत उन्हात थंडगार सावली देणारी झाडे पर्यावरणाचे संतुलन राखतात. मात्र क्षुद्र स्वार्थापोटी माणूस कृतघ्न बनू शकतो, हे व्ही.आय. पी. रोडवरील सिटी हॉस्पिटल इमारतीलगत दिसून आले. सावली देणार्‍या वृक्षांच्या फांद्या तोडून अक्षरश: चार झाडांना बोडके करण्यात आले. यावर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा करण्यासाठी पालिकेचे उद्यान अधिकारी र्शी. कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ते संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे समजले.

>दुकानावरील फलक दिसत नाही म्हणून करण्यात आलेले हे कृत्य आहे. तापमान वाढतेय, पर्यावरण समतोल बिघडला अशा वेळी झाडांना बोडके करणे गंभीरच. हे पाप पहाटेच्या वेळी करण्यात आले आहे.
-सुजित चौगुले, पर्यावरणप्रेमी