आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरच्या महापौर माळवी रुग्णालयात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- एका सहीसाठी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी अटक टाळण्यासाठी शनिवारी येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी सांगितले.
माळवी यांना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता खासगी स्वीय सहायकामार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. महिलेला रात्री कस्टडीमध्ये ठेवण्यासाठी कायदेशीर अडचण असल्याने त्यांना गरज भासेल तेव्हा येण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.