आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विकासासाठी गुडेवार हवेच..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुक्त गुडेवार यांनी आपल्या धडाकेबाज कामांमुळे सोलापूरची प्रतिमा सुधारली. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेची सूत्र असणार्‍या काँग्रेसला जे जमलं नाही ते गुडेवारांनी दहा महिन्यांत करून दाखवले. त्यामुळे गुडेवारांना त्रास दिला जातोय. व्यंकटेश धांडोरे, विद्यार्थी

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी लोकशाही पद्धतीने प्रशासकीय कामकाज करत पालिकेतील हुकूमशाही व भ्रष्ट कारभाराला लगाम घातला. पण, त्यास स्वार्थी पुढार्‍यांकडून त्रास दिला जातो. यातून स्वार्थी पुढार्‍यांचे खरे रूप दिसले. मळसिद्ध हेळवी, विद्यार्थी
गुडेवारांसारख्या अधिकार्‍याला मुद्दाम कोंडीत पकडणे चुकीचे आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या कामावर बंधने येतात. अशा घातक प्रवृत्तींना नष्ट करून सोलापूरच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गुडेवारांनी त्या दिशेने पावले उचलली होती. अविनाश तमनूर, व्यावसायिक
कुशल प्रशासकांना काही उपद्रवी मंडळींकडून विरोध हा होणारच. मात्र गुडेवार यांनी त्या विरोधाला न जुमानता पुन्हा आपला पदभार स्वीकारायला हवा. शिवाय सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन प्रामाणिक अधिकार्‍याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. प्रफुल्लता अल्लापूरकर

सोलापूरच्या विकासाला हातभार देणार्‍या गुडेवारांसारख्या अधिकार्‍यांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीपुढे हात टेकण्याची वेळ यावी ही दुर्दैवी गोष्ट मानायला हवी. क र्तव्यदक्ष अधिकार्‍यांना त्रास होतो. वैदही अष्टपुत्रे, लिपिक
गुडेवार आल्यापासून सोलापूरचा विकास झाला आहे. त्यामुळे सोलापूरला अशा अधिकार्‍यांची गरज आहे. पाणी प्रश्न खूप गंभीर आहे. मात्र यावर अशा प्रकारे आंदोलन करून प्रश्‍न मिटणार नाही. त्यासाठी उपाययोजनाची चर्चा करणे आवश्यक आहे. अमोल कुलकर्णी, व्यावसायिक
गुडेवार यांनी सोलापुरात आल्यानंतर बेकायदेशीर कामांवर कारवाई केली. ही कारवाई करताना त्यांनी कोणालाच जुमानले नाही. राजू कामूर्ती
गुडेवार यांनी सोलापुरात धडाडीने काम केले. पारदर्शी, निर्भीड अशी जनसेवा करताना आयुक्तांनी कोणाला भीक घातली नाही. तर आंदोलनाकर्त्यांमुळे त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. नाहीद शेख
कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांच्या पाठीमागे जनता नेहमीच असते. ‘जनसेवा हीच ईश सेवा’ या ब्रीद वाक्याप्रमाणे सेवा करीत असताना आयुक्तांनी कोणाला घाबरू नये. आयुक्तांनी सोलापूरचा खरोखरच चेहरा मोहरा बदलायचा असेल तर त्यांनी निर्णय मागे घ्यावा. हाजी ताजोद्दीन कल्याणी
बर्‍याच वर्षांनंतर सोलापूरला एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी मिळाला होता. त्यांच्या कारकिर्दीत मनपाचे उत्पन्न वाढले. अशा अधिकार्‍यांच्या जाण्याने शहराचे नुकसान होईल. याप्रकरणी गृहमंत्री सुशीलकु मार शिंदे यांनी लक्ष घालावे. अतुल लोहोकरे, नोकरदार
सोलापूर. विकासासाठी धडाडीने काम करणार्‍या चंद्रकात गुडेवारांसारख्या अधिकार्‍याची शहराला गरज आहे. पण, भ्रष्टाचारी प्रवृत्तींना असे अधिकारी नकोच असतात. त्यामुळे अशा अधिकार्‍यांना त्रास दिला जातो. त्रास देणार्‍यांना रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे. गुडेवार यांनी पदभार सोडण्याचा निणर्य मागे घ्यावा, अशा प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.