आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी महापािलका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची हालचाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एनटीपीसीकडूनसोलापूर शहरासाठी टाकण्यात येणारी जलवाहिनी उजनी प्रकल्पातून जलउपसा करण्यासाठी जॅकवेल बांधण्यात येणार आहे. उजनी धरणाने तळ गाठला, तरीही उपसा करता यावा यासाठी त्याची जागा बदलण्याचा निर्णय झाला. दरम्यान, एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी परिसराची पाहणी केली. शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने १४४२ कोटींची पाणीपुरवठ्याची योजना आखली असली तरी एनटीपीसीकडून शहरासाठी उजनी ते सोलापूर स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी उजनी धरणात जॅकवेल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी एनटीपीसीचे एक उच्चस्तरीय पथकाने उजनी धरणाला भेट देऊन पाहणी केली.
महापालिकेने जॅकवेलच्या जागेत बदल सुचवले असून, त्याची पाहणी एनटीपीसी डिझायन टीमकडून करण्यात आली. त्यानंतर त्या पथकातील सतीश उपाध्याय यांनी मनपाच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे "दिव्य मराठी'शी बोलताना सांिगतले. जागेची पाहणी केल्यानंतर एनटीपीसीने सकारात्मक भूमिका घेतल्याने योजनेची सुरुवात सहा महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी टेंडर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे एनटीपीसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अडीचवर्षांनंतर गती
शहरासाठीएनटीपीसीकडून टाकळी ते पाकणीपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी, धरणात जॅकवेल बांधण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी प्रयत्न करून मंजुरी दिली. मागील अडीच वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. उजनी येथील उपसा करण्याबाबत आयुक्त गुडेवार यांनी प्रयत्न करून एनटीपीसी अधिकाऱ्यांना भेटून प्रयत्न सुरू केले आहेत.
उजनी परिसराच्या जागेची पाहणी करण्यासाठी एक पथक बुधवारी येथे आले होते. यात एनटीपीसीचे सहाय्यक व्यवस्थापक सतीश उपाध्याय (आराखडा विभाग), बी. मुकोपाध्याय, सिनीअर मॅनेजर देवाशिष मंडल, शिरीष बारकुल, व्ही. मधू, प्रफुल्ल कुमार यांचा समावेश होता.
सकारात्मक विचार होईल
याबाबतएनटीपीसीकडून सकारात्मक विचार केला जाईल. शहराच्या हिताचे असेल तर नवीन जागेत जॅकवेल तयार करता येत असेल तर त्यास एनटीपीसी लवकरच मंजुरी देईल. सतीशउपाध्याय, साहाय्यकव्यवस्थापक एनटीपीसी डिझायन विभाग
तफावत रक्कम मनपा भरेल
एनटीपीसीकडून७५ एमएलडी क्षमेतेचे जॅकवेल मंजूर अाहे. परंतु सोलापूर शहराच्या भविष्यकाळाचा विचार करता ते १५० एमएलडीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. महापािलकेचे हित पाहता जॅकवेलची जागा बदलण्याची मागणी आम्ही एनटीपीसीच्या अिधकाऱ्यांकडे केली होती. त्याची पाहणी एनटीपीसी अधिकाऱ्यांनी केली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर शहरासाठी ते खूपच फायदेशीर होईल यात कोणतीही शंका नाही. चंद्रकांतगुडेवार, मनपाआायुक्त

१५० एमएलडीचा जॅकवेल
एनटीपीसीकडून७५ एमएलडीचा जॅकवेल मंजूर होता. पण आगामी ३० वर्षांचा विचार करता मनपा आयुक्त गुडेवार यांनी तो १५० एमएलडीचा करण्याचा निर्णय घेतला. जॅकवेलसाठी जागा मनपाच्या पंप हाऊसपासून लांब पल्ल्यावर होती. त्यामुळे आगामी काळात मनपाला ते अडचणीचे ठरणार आहे आणि उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी झाली तरी पाणी उपलब्ध असावे या उद्देशाने जागा बदलण्याची मागणी केली, त्यानुसार ती जागा निश्चित करण्यासाठी हे पथक आले होते. ते त्यांना दाखवण्यात आले. मनपाला कसे फायदेशीर आहे आणि ते तांत्रिकदृष्ट्या कसे योग्य आहे, याची माहिती अरुण शेटे यांनी दिली. या वेळी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उजनी धरण लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अजय दाभाडे, एनटीपीसीचे डिझायन पथक, मनपाचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी विजय राठोड, उपअभियंता लक्ष्मण चलवादी, यलगुलवार आदी उपस्थित होते.

बुधवारी दुपारी एनटीपीसीच्या अिधकाऱ्यांनी उजनी धरणाला भेट देऊन जॅकवेल बांधण्यासंदर्भात जागेची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत महापािलका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हेही उपस्थित होते.