आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौर डोंगरे आणि दिलीप कोल्हे यांच्यात हमरीतुमरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पक्षातीलनगरसेवकांना विश्वासात घेता काम करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपमहापौर यांच्यात गुरुवारी चांगलीच जुंपली. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कक्षात त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक दिलीप कोल्हे यांच्याशी हमरीतुमरी झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षातील काही नगरसेवक उपस्थित होते. घटनेची माहिती डोंगरे यांनी दिल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर सपाटे यांनी सांगितले. पक्षासमोर बाजू मांडणार असल्याचे नगरसेवक कोल्हे यांनी सांगितले.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमहपौर डोंगरे यांनी गुरुवारी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. चार-पाच नगरसेवक उपस्थित होते. ‘सभागृहातील पक्षाची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, नगरसेवकांची कामे झाली पाहिजेत,’ असे सांगत कोल्हे यांनी डोंगरे यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. यात उपमहापौरांचा शर्ट फाटल्याचे सांगण्यात आले.

माहिती दिली
-घटनेबाबतप्रवीण डोंगरे यांनी माहिती दिली. सध्या पुण्यात आहे. त्यामुळे तपशील माझ्याकडे नाही. सोलापुरात आल्यानंतर दोघांशी बोलणार आहे.” मनोहरसपाटे, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी

पक्षांतर्गत वाद
-नगरसेवकांचीकामे होत नाहीत. ती झाली पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे. आमच्यात काय झाले तो अंतर्गत विषय आहे. पक्षश्रेष्ठींसमोर माझे मत मांडेन. पक्षाची बैठक म्हटले की थोडासा वाद होणारच की. शर्ट फाटला नाही आणि मारामारीही झाली नाही.” दिलीपकोल्हे, नगरसेवक
विकासकामे करणार
-उपमहापौरविकासकामे करण्यासाठी झालो आहे. किरकोळ वाद होता. माझा शर्ट फाटला नाही. असा काही अनुचित प्रकार घडलेला नाही. याबाबत कोणाकडे तक्रार केलेली नाही.” प्रवीणडोंगरे, उपमहापौर