आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे नगरसेवक गेले हैदराबादला; युतीत शांतता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक एक दिवसावर आली असताना खबरदारी म्हणून काँग्रेसच्या काही नगरसेवकांना हैदराबाद टूरवर नेण्यात आले आहे. महापालिकेत चमत्कार घडेल असे म्हणणारे युतीचे नेते गुरुवारी शांतच दिसून आले. युतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी रात्री होणार आहे. त्या बैठकीत चमत्कार घडवता येईल का? याबाबत खलबते होणार आहेत.
दरम्यान, बसपानेही तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली. महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी आघाडीकडून अनुक्रमे सुशीला आबुटे आणि प्रवीण डोंगरे तर युतीकडून नरसूबाई गदवालकर, मेनका चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले महेश कोठे चमत्कार करतील अशी चर्चा होती. परंतु पक्षातील हालचाली पाहता, शांतता असल्याचे दिसून येते. फाटाफूट टाळण्यासाठी काँग्रेसने २२ नगरसेवकांना हैदराबादला धाडले. काँग्रेस भवनासमोरून हा जत्था निघाला.
आमची मते शाबूत
मनपातसत्तांतर होईल असे वाटत नाही. पण महापौर उपमहापौर निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. आमचे गदवालकर चव्हाण यांना युतीचे नगरसेवक मतदान करतील. पांडुरंगदिड्डी, प्रभारीविरोधी पक्षनेता
काँग्रेससोबतच राहू
काँग्रेसबरोबरआमची आघाडी असून, महापौर त्यांचा आणि उपमहापौर प्रवीण डोंगरे होतील. आम्ही काँग्रेससोबत राहणार आहोत. दिलीपकोल्हे, राष्ट्रवादीगटनेता
आमचाच महापौर
काँग्रेसपक्षाकडून आबुटे महापौर होतील. यात शंका नसून, आमचे एकही मत फुटणार नाही. आघाडीची सर्व मते आबुटे यांना मिळतील. संजयहेमगड्डी, मनपासभागृह नेता
माकपा तटस्थ
महापौरउपमहापौर निवडणुकीत माकपा बसपा तटस्थ राहणार आहे. बसपा शहराच्या हितासाठी प्राधान्याने मनपा काम करत असून ते पुढे करत राहणार आहे. आनंदचंदनशिवे, बसपामाकपा गटनेता