आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mayor Sushila Abute, Said Why Ignore Shinde Saheb Has Given The Candidate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिंदेसाहेबांनी दिलेल्या उमेदवाराकडे दुर्लक्ष का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरात आल्यावर त्यांचे उत्साहात स्वागत करता, अवतीभोवती असता, त्यांचा जयजयकारही करता, मग पोटनिवडणुकीत साहेबांनी दिलेल्या उमेदवाराकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न महापौर सुशीला आबुटे यांनी उपस्थित केला. काँग्रेसची ताकद दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभी करून पोटनिवडणुकीत विजय मिळवू, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापालिका प्रभाग क्रमांक चार १८ च्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेवार पद्मावती गज्जम कृष्णाहरी चिनी यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेस भवनमध्ये शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी शहराध्यक्ष धर्मा भोसले, ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया, माजी नगरसेवक अमोल शिंदे, अजय दासरी, शांता जाधव, माजी महापौर नलिनी चंदेले आदी उपस्थित होते.
संधी साधूंना मतदार जागा दाखवतील
महापौर आबुटे म्हणाल्या, “सोलापुरात काँग्रेसची विचारधारा आहे. माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यामुळेच विकासाला गती मिळाली आहे. काँग्रेस पक्षामुळे मोठे झालेल्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पक्षांतर केले. स्वार्थी संधीसाधू लोकांना विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवली आहे. तेच सूज्ञ मतदार यावेळेसही पक्षाच्या निष्ठावंत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील.”
दोन्ही ठिकाणी पक्षाचा विजय निश्चित
शहराध्यक्ष यलगुलवार म्हणाले, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल पक्षात घेतली जाते. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे निष्ठावंत उमेदवार विजयी होतील. मोदींची लाट संपल्याचे त्या निकालावरून स्पष्ट होईल. रविवारी पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे शहराध्यक्ष यलगुलवार यांनी स्पष्ट केले.