आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांच्या शैक्षणिक ऑडिटला ‘एमसी’ची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करण्याची तयारी सोलापूर विद्यापीठाने केली आहे. त्यातून महाविद्यालये किती गुणवत्ता पूर्ण कार्य करतात याची माहिती पुढे येईल. व्यवस्थापन समितीच्या (एमसी) बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. येत्या वर्षात ४० महाविद्यालयांची तपासणी होणार आहे.
जिल्ह्यातील ११९ महाविद्यालयांची विविध मुद्यांच्या निकषावर गुणवत्ता जोखली जाणार आहे. महाविद्यालयांनी ३०० गुणांच्या निकषापैकी जास्तीत जास्त गुण मिळविणे अपेक्षित आहे. ए, बी, सी डी अशा ग्रेड मध्ये गुणांकन होईल. ७० टक्केपेक्षा जास्त गुण असल्यास ग्रेड, ६० ते ७० टक्के असल्यास बी ग्रेड, ५० ते ६० टक्के असल्यास सी ग्रेड आणि ५० टक्के पेक्षा कमी गुणांकन मिळाल्यास वर्गात महाविद्यालयांचा समावेश केला जाणार आहे.
अहवाल उच्च शिक्षण विभागाला पाठविण्यात येणार आहे. संपूर्ण तपासणी संकेतस्थळावर मांडण्यात येईल. यातून महाविद्यालयांची प्रगती किती सरस, किती सुधारणा करण्यास वाव असेल , हेही सर्वांसमाेर असणार आहे, असे महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्रा. आर. वाय. पाटील म्हणाले.

परिणाम काय?

विद्यापीठ कायद्यानुसार प्रत्येक तीन वर्षाने महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करणे गरजेचे असते. स्थापनेपासून विद्यापीठाने अशी तपासणी केलेली नाही. परिणामी महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता किती? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आता अ, ब, दर्जा प्राप्त महाविद्यालये, त्यांचा शैक्षणिक दर्जा विद्यापीठच घोषीत करेल. पुढील तीन वर्षात अधिक चांगला दर्जा मिळवण्याची संधी प्रत्येकास असेल. पहिल्या दुसऱ्या वर्षी प्रत्येकी ४० आणि उर्वरित कॉलेजची तपासणी तिसऱ्या वर्षी होईल.
- सुमारे ४० महाविद्यालयांचे शैक्षणिक ऑडिट या वर्षात होईल. त्यासाठी विविध कमिटी स्थापल्या जातील”
डॉ. एन.एन. मालदार, कुलगुरू

- ऑडिट झालेल्या महाविद्यालयांचा अहवाल उच्च शिक्षण विभागाकडे अवलोकनासाठी पाठवला जाईल.”
आर. वाय. पाटील, संचालक, बीसीयूडी
जास्तीत जास्त गुण मिळविणे गरजेचे
विद्यार्थ्यांचे प्रवेश किती? मान्यता प्राप्त शिक्षक संख्या, नियमित प्राचार्य? मान्यपैकी किती पदे भरलेली? एम.फील, पीएच.डी. धारक किती? लायब्ररी आणि पुस्तके किती? किती संगणक? प्रयोगशाळा आहे? सेमीनार होतात? आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य स्तरीय किती? शैक्षणिक गुणवत्ता काय? आरटीआय नुसार सुविधा? अॅण्टी रॅगिंग कमिटी आदी समित्या? विद्यार्थी सुविधा? कॉमन रूम? क्रीडा, युवा महोत्सव यात सहभाग? आदी निकषांवर ३०० गुणातून जास्तीत जास्त मिळवावे लागेल.
तपासणीचे निकष गुण
१५० गुण अॅकॅडमिक
२० गुण गव्हर्नन्स पॉलिसी मेकिंग
६० गुण इन्फ्रास्ट्रक्चर स्टुडंट अमेनिटीज
२० गुण सोशो- इकॉनॉमिक
२० गुण मॅनेजमेंट ऑफ फायनान्स
३० गुण अॅडमिनेस्ट्रेटिव्ह
एकूण- ३०० गुण
बातम्या आणखी आहेत...