आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meditation Class In School Issue In Solapur School

विपश्यना तासिकेकडे दुर्लक्ष, तीन वर्षांपासून आदेश बासनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहा दिवसांपूर्वी एका मुलाने जर्कीन घेऊन दिले नाही यासाठी आत्महत्या करण्याचा पुण्यात धक्कादायक प्रकार घडला. मुलांत मोठ्या प्रमाणावर हट्टाची वृत्ती वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी सरकारने प्राथमिक शाळेत आनापान वर्ग (विपश्यना) घेण्याचे सुचवले आणि त्याच्या अंमलबजावणीचे आदेशही दिलेत. याला तीन वर्षे लोटली. या तीन वर्षांत एकही वर्ग झालेला नाही.
मुख्याध्यापकांकडून आदेशाची अवहेलना, तर शिक्षणाधिकाऱ्यांकडून डोळेझाक होत आहे.
आनापान म्हणजेच विपश्यना साधना पद्धती. शालेय शिक्षण विभागाने ऑक्टोबर २०११ रोजी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शाळांत साधना वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. यासाठी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, धम्मगिरी इगतपुरी (नाशिक) संस्थेतर्फे आयोजित १० दिवसीय शिबिरात उपस्थित असावे यासाठी जाण्या-येण्याचा प्रवास कालावधी अशी १४ दिवस रजा कार्यालयीन कर्तव्य काल यासाठी देण्यात यावी, असे सूचवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी उपक्रमाचे अध्यक्ष आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबवणे शासनाला अपेक्षित आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील अनेक शाळांनी दुर्लक्ष केले आहे, असे दिसून येते.

कोंडमारा होतो
^मुलांवर अभ्यासाचा खूप ताण असतो. तसेच मुलाची जडणघडण, व्यक्त होण्याची प्रवृत्ती, वैयक्तिक गरजा, याचाही विचार करून शिक्षकांनी वागणे अपेक्षित आहे. आनापानमुळे मुलांत ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होईल.” डॉ.प्रसन्न खटावकर, मानसोपचारतज्ज्ञ, सोलापूर

काही शाळांत वर्ग
^काही शिक्षकांना आनापान वर्गाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रार्थनेच्या आधी पाच मिनिटे विपश्यना घेतली जाते. काही शाळांत वर्ग चालू आहे. तर काही ठिकाणी सुरू नाहीत. आनापान वर्ग घेण्याची सूचना प्रशालेला देण्यात येईल.” राजेंद्रबाबर, शिक्षणाधिकारी,प्राथमिक विभाग

निर्णयाकडे दुर्लक्ष
^शाळांत नेहमीच सरकारी आदेशाच्या निर्णयाची पायमल्ली होत असते. त्याच प्रमाणे या आदेशाचे उल्लंघन होत आहे. आनापान वर्गाची माहिती बोलावून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक आदी जबाबदार घटकांवर कारवाई करावी.” समर्थ जाधव, पालक

शाळांवर कारवाई करणार
^मुलांच्या मानसिक जडणघडणीत, वैयक्तिक विकासात होणारा उपयोग लक्षात घेऊन साधना वर्ग प्रत्येक प्राथमिक शाळांनी घ्यावेत. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल. आनापान वर्ग माध्यमिक शाळा महाविद्यालये यात नाहीत. कारण, याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्ट सूचना दिलेली नाही. याबाबत माहिती घेऊ. याच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून निधी मिळत नाही.” लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी,माध्यमिक विभाग
अनेक शाळांना आदेश नाही
शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अनेक शाळांत आदेश पोचलेला नाही. त्यामुळे शाळांमध्ये उपक्रम घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगण्यात आले. मात्र, तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाचे शाळांनी, शिक्षण विभागाने पालन केलेले नाही. शाळांना माहिती देण्याची गरज आहे.
प्रशिक्षण दिले पुढे काही नाही
शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही. सुमारे १०० शिक्षकांना याचे प्रशिक्षण दिले आहे. मात्र,कोणत्याही शाळांत अशा प्रकारचा उपक्रम होत नाही, असे निष्प्पन्न झाले आहे. शासनाने याचे गांभीर्य ओळखू्न प्रशिक्षण चालू केले. मात्र, शाळा याबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेत नाही.
जिल्ह्यात घटना घडल्या आहेत
शाळा महाविद्यालयात मुलांच्या आत्महत्येचे प्रकार घडले आहेत. शाळांत मुलांना वाढता ताण सहन होत नसल्याने हा प्रकार घडला आहे. मानसीक ताणामुळे महाविद्यालयातील जणांनी गेल्या दोन वर्षांत आत्महत्या केली आहे. त्यामुळे अनापान वर्ग घेण्याची गरज जास्त आहे.