आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting Of District Planning Committee In Solapur

अधिकार्‍यांना धरले कोंडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहर व जिल्ह्यातील पाण्याची टंचाई, रस्त्यांची कामे, दुष्काळ नियोजन, अखर्चित निधी, वाढीव तरतुदीच्या प्रश्नांवरून आमदार व सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासकीय अधिकार्‍यांना कोंडीत धरले. शहरातील पाणी, स्वच्छता व नगरोत्थान विकास कामांवरून महापालिका अधिकारी व शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या कामांवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पालकमंत्र्यांनी बैठकीतच झापले. जिल्ह्यातील पाणलोट विकास, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 56 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

मागण्या आमदारांच्या : गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी एक रुपयांचा निधी मिळाला नाही, रस्ते खराब असल्यामुळे खेड्यांमध्ये जाणार्‍या एसटी फेर्‍या बंद असल्याने त्वरित निधी द्यावा, अशी मागणी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केली.

कामांची गुणवत्ता व उपयोग न पाहताच ठेकेदेरांची संपूर्ण बिलं देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार भारत भालके यांनी केली. जलस्वराज्य योजनेच्या कामांची चौकशी करून सदोष कामं केलेल्या ठेकेदारांची 10 टक्के रक्कम अडवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला.

जुळे सोलापुरातील जानकीनगर बागेसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागेसाठी नियोजन समितीतून निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार दिलीप माने यांनी केली.

नियोजन समितीतून फक्त अग्निशमन साहित्यांची खरेदी करण्यात येते. पण, निमयांमध्ये बदल करून नवीन अग्निशमन बंब व साहित्यांची खरेदी करावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

दादा रुपयादेखील देत नाही म्हणाले...

जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी अपुरा असल्याने वाढवून देण्याची मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी केली. त्यावर जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे म्हणाले,‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात आले असता त्यांच्याकडे निधीची मागणी केली. पण, रुपयादेखील मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.’’ यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी म्हेत्रे यांना आवरण्याचा प्रयत्न केला.