आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting Of Theatrical Start From Gadhawache Lagna Issue

गाढवाच्या लग्नाने वाजली नाटयपरिषदेची पहिली घंटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- वातावरण निर्मितीसाठी गुरुवारी (ता.30) सायंकाळपासूनच कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आलेली आहे. आज सायंकाळी सात वाजता मुख्य शं. ना. नवरे नाट्यनगरीमध्ये गाढवाचं लग्न या वगनाट्याने सुरुवात झाली. हे वगनाट्य पाहण्यासाठी नाट्यरसिक मंडळीची गर्दी झाली होती.

यशस्वी आयोजनासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, सहकार्यवाह दीपक करंजीकर तसेच इतर पदाधिकारी स्वत: इथे तळ ठोकून आहेत. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने इथे तयार करण्यात आलेल्या शं. ना. नवरे नाट्यनगरीमधील (कै.) विनय आपटे मुख्य मंचावरच येथील नाट्यरसिकांसाठी खास मोहन जोशी यांनी स्वत: भूमिका साकारत असलेल्या गाढवाचं लग्न या नाटकाचे (ता.30) सुरुवातीलाच आयोजन केले आहे.

या नाटकाबद्दल माहिती देताना नाट्य परिषदेचे श्रीपाद जोशी म्हणाले, की गाढवाचं लग्न हे सुंदर वगनाट्य आहे. शाप मिळाल्यानंतरची अवस्था काय होते हा विषय या नाटकांमधून विनोदी पद्धतीने मांडण्यात आलेले आहे. अद्वैत थिएटरची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन हरिभाऊ वडगावकर यांचे असून दिग्दर्शन स्वत: मोहन जोशी यांचे आहे. दरम्यान, गाढवाचं लग्न या नाटकामधून प्रमुख भूमिका साकारणार्‍या सविता मालपेकर, अर्चना जोगळेकर, वृषाली भोसले, वसंत अंबसरीकर, संजीवनी मुळे नगरकर आदी मंडळींचे दुपारीच मुंबईहून येथे आगमन झाले होते. या नाट्यकलावंतांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी येथील विश्रामगृहामध्ये स्थानिक नागरिकांनी, नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी तसेच सदस्यांनी मोठी गर्दी केलेली होती.

पंढरपूर : शं. ना. नवरे नाट्यनगरीमधील (कै.) विनय आपटे रंगमंचावर गुरुवारी सायंकाळी गाढवाचं लग्न या वगनाट्यात अभिनेते मोहन जोशी आणि दुसर्‍या छायाचित्रात वगनाट्याच्या प्रसंगातील अन्य कलावंत. छाया : राजू बाबर