आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरीत वाढला वेड्यांचा उपद्रव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - पंढरपुरात सध्या मोकाट फिरणार्‍या वेड्यांच्या संख्येत खूपच वाढ झालेली दिसत आहे. साधारणपणे रेल्वे, एस. टी. स्थानक तसेच शहरातील गजबजलेल्या भागातून अशा मोकाट फिरणार्‍या वेड्यांचा नागरिकांना उपद्रव सहन करावा लागतो. बर्‍याच वेळा अंगावर वस्त्रे नसणार्‍या अवस्थेतील अशा वेड्या स्त्री-पुरुषांचा शहरातील तरुण मुलींना तसेच महिलांना त्रास सहन करावा लागतो. पोलिस प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवरून फिरणार्‍या अशा वेड्यांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

पंढरपूर हे राज्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक र्शी विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. वर्षभरात आषाढी, कार्तिकी, चैत्री तसेच माघी या चार प्रमुख यात्रा या ठिकाणी भरत असतात. प्रत्येक यात्रा झाल्यानंतर शहरातील वेड्यांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. नुकतीच आषाढी यात्रा झालेली आहे. त्या मुळे शहरातील जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक , रेल्वेस्थानक , र्शी विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट अशा भागात सध्या वेड्या स्त्री-तसेच पुरुषांची मांदियाळी दिसून येत आहे.

या संदर्भात शहरातील पोलिसांशी (नाव न छापण्याच्या अटीवर) संपर्क साधून त्यांच्याकडून दिवसेंदिवस शहरातील या मोकाट फिरणार्‍या वेड्यांच्या संख्येत होणार्‍या वाढीसंदर्भात चर्चा केली असता अनेक धककादायक माहितीचा उलगडा होऊ लागला. बाहेरगावातून घरामध्ये उपद्रवी ठरणार्‍या वेड्यांना त्यांचे नातेवाइक पंढरपूर येथे आणून सोडतात. कारण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी भीक मागून का होईना या वेड्यांचा उदरनिर्वाह चालू आहे.


संख्या वाढण्याची कारणे
रेल्वेची झालेली सोय. घरातील उपद्रव टाळण्यासाठी तीर्थक्षेत्राचे ठिकाण. विविध मठ व धर्मशाळांची जास्तीची संख्या. रोज मोफत पंक्तींचे वाढते प्रमाण. नदीचे विस्तीर्ण वाळवंट. भाविकांची वर्दळ असल्यामुळे वेड्यांना सोडून गेले तरी फारसे लक्षात येत नाही.


या ठिकाणी आहे ठिय्या
रेल्वे स्टेशन, जुने व नवीन बसस्थानक, स्टेशन रस्त्यावरील पोस्ट ऑफीसजवळ, र्शी विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रातील वेगवेगळे घाट, शहरातील रेल्वेच्या बोगद्याखाली.
यात्रेआधी पोलिसांकडून भिकारी तसेच वेड्यांवर कारवाई केली होती. यात्रेनंतर पुन्हा कोणकोणत्या भागात अशा लोकांची संख्या जास्त आहे, याची माहिती घेऊन पुन्हा एकदा निश्चितच कारवाई केली जाईल.’’ बाळासाहेब रेड्डी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक


विवस्त्र अवस्थेमधील वेडे स्त्री-पुरुष फिरत आहेत. त्यामुळे ते समोर आल्यानंतर शरमेन स्त्रियां-मुलींना मान खाली घालावी लागते. शाळेत जाणारी लहान मुले या वेड्यांना घाबरतात. पोलिसांनी अशांचा बंदोबस्त करायला पाहिजे.’’