आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मानसिक रुग्णांची संख्या वाढतेय, आरोग्याविषयी जनजागृती गरजेची’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाट्यछटा सादर केल्या. त्यानंतर त्यांच्यासमवेत अधिष्ठात डाॅ. माधवी रायते प्राध्यापक.)

सोलापूर- दिवसेंदिवस मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळीच उपचार केल्यामुळे जीवनात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्याइतकीच मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याची गरज आहे. त्याविषयी जनजागृती व्हायला हवी, असे प्रतिपादन अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. माधवी रायते यांनी केले.

गुरुवारी (दि. ४) जागतिक स्किझोफ्रेनिया (दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व) दिनानिमित्त कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. रायते म्हणाल्या, ‘मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मानसिक तणाव वाढला की त्याचे पर्यवसान आत्महत्येत होते. स्किझोफ्रेनियामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मानसिक संतुलन बिघडले की लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेणे टाळतात. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यास त्यावर मात करता येते. उपचारामुळे मानसिक आजार बरे होतात. मात्र, समाज आपल्याला काय म्हणेल, या भीतीपोटी रुग्ण आजार दडवतात. परंतु उपचार घेणे टाळल्यास मोठी जोखीम पत्करावी लागते. विशेषत: मुलांमध्ये नैराश्य येते, त्यातूनच मानसिक आजार बळावतात. हे टाळण्यासाठी समाजप्रबोधन आवश्यक आहे. त्यामुळे मानसिक आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य निरोगी राहू शकेल.’ यावेळी उपअधिष्ठाता डाॅ. सचिन मुंबरे, डाॅ. नितीन भाेगे, सामाजिक वैद्यकशास्त्र विभागाचे डाॅ. महेश तोंडारे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडून प्रबोधन : वैद्यकीयमहाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्किझोफ्रेनिया आजारावर जनजागृतीपर नाट्यछटा सादर केल्या. आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने प्रफुल्लित असले पाहिजे. मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवले पाहिजे, हा संदेश यातून देण्यात आला.