आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीतील चालकाचा सुपुत्र बनला मुंबईतील ‘मेट्रो’चा सारथी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गतिशील व आरामदायी दळणवळणातील सेवावैभव म्हणून मुंबईतील ‘मेट्रो ट्रेन’कडे पाहिले जाते. वर्षानुवर्षापासून मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. सोलापुरातील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने स्पर्धा परीक्षेत बाजी मारून ‘मेट्रो ट्रेन’चा सारथी होण्याचा मान मिळवला. आयुष्यभर सोलापूर झेडपीतील वाहनाची स्टेअरिंग सांभाळणारे राजन काळे यांचा चिरंजीव आता मेट्रोचे सारथ्य करीत आहे. सोलापूरकरांसाठी हे भूषणावह आहे.
झेडपीतील अतिरिक्त सीईओच्या वाहनाचे चालक म्हणून वडील राजन काळे सेवेत आहेत. आई आशा या गृहिणी. माता-पित्यांच्या वाटेला आलेल्या संघर्षमय जीवनातून नवी वाट शोधण्यासाठी योगेशने ध्येयाने शिक्षणाची कास धरली. वडिलांचे जगण्यातील कष्ट पाहतच लहानाचा मोठा झालेल्या योगेशने स्वत:च्या जगण्यात वडिलांच्या क्षेत्रात नवे काही करता येईल का याचे स्वप्न पाहिले होते. सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याने पूर्ण केले. चिकाटी आणि ध्येय या बळावर तो मेट्रो ट्रेनचा चालक बनला अन् स्वप्न सत्यात उतरवले. सोलापूरच्या या सुपुत्राने मुंबईच्या लाडक्या मेट्रोची पहिल्या दिवसापासून सेवा सुरू केली आहे. मुंबईकरांना आरामदायी मेट्रोच्या सफरीचा तो मनमुराद आनंद देत आहे.