आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटपडताळणीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार - जयवंत हक्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र शासनाकडून 4 जुलै रोजी घेतलेल्या सुधारित पटपडताळणी निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक सेवक समितीचे निमंत्रक आमदार विक्रम काळे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना भेटणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक समितीचे राज्याध्यक्ष जयवंत हक्के यांनी दिली.
2 मे 2012 रोजी शासनाने 3 ते 5 ऑक्टोबर 2011 दरम्यान विशेष पटपडताळणीबाबत जो निर्णय घेतला. त्या निर्णयास औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती आदेश दिला असताना शासनाने नव्याने 4 जुलै 2012 रोजी सुधारित आदेश काढून जिल्हाधिकार्‍यांना याबाबत तपासणी करून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत या कार्यवाहीचा अहवाल शासनाला दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत संघटनेचे निमंत्रक आमदार विक्रम काळे आणि निरंजन डावखरे यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती असताना 4 जुलै 2012 च्या शासन निर्णयावर विधान परिषदेत विषय चर्चेला घेऊन मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना याबाबत फेर विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, अशी माहिती कार्याध्यक्ष निंगप्पा तळवार यांनी दिली. शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष भरत रसाळे, जयवंत हक्के, शिवाजी भोसले, प्रकाश कोळी, मनोज साळुंके, अंजन कुमार पाटील, ओमप्रकाश वाणी आदींचा समावेश आहे.