आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milk Express Provided One Hand Half Litter Milk To Delhi

मिल्क एक्स्प्रेसने दिल्लीला पुरवले दीड कोटी लिटर दूध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून पहिल्यांदाच सुरू झालेली दौंड ते दिल्ली या मिल्क एक्स्प्रेसला 30 जुलैला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभराच्या या कालावधीत या एक्स्प्रेसमधून सुमारे 3 कोटी 90 लाख लिटर दूध दिल्लीला पाठविण्यात आले. त्यात एक कोटी 40 लाख लिटर इतका निम्मा वाटा एकट्या सोलापूर जिल्ह्याचा आहे. तसेच, एक्स्प्रेसमुळे रेल्वेला 8 कोटी 67 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

केवळ सोलापूर विभागातूनच नव्हे तर मध्य रेल्वेतून अशी सेवा पहिल्यांदाच देण्यात आली. दिल्ली येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने यासाठी पुढाकार घेतला आहे. दूध हे नाशवंत असल्यामुळे ते अधिक काळ टिकावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी संपूर्ण थंडावा देणारे डबे नॅशनल डेअरीने तयार केले. या रेल्वेला 15 वॉगन जोडण्यात आल्या आहेत. एका वॉगनमध्ये 40 हजार लिटर दूध सामावू शकते. त्यामुळे एका ट्रीपमधून 6 लाख लिटर दुधाची वाहतूक होते.

वर्षभरात अशा 58 फेर्‍या झाल्या आहेत. एका फेरीमधून रेल्वेला 13 लाख 75 हजारांचे उत्पन्न मिळाले. गुजरातमधील मदर्स डेअरीची या दूध संकलनाची मुख्य जबाबदारी आहे. दूध संकलनाचे सोलापूर, पुणे, सातारा असे कार्यक्षेत्र आहे. दूध संकलनाची जबाबदारी संपूर्णपणे मदर्स डेअरीवर असली तरीही मदर्स डेअरीच्या वतीने सातार्‍यातील स्वराज्य दूध डेअरी संकलनाचे काम बघते.


..तरीही दूध पुरवठा
15 ऑगस्टपासून पुन्हा एक्स्प्रेस सुरू
मिल्क एक्स्प्रेसच्या 15 वॉगनपैकी 7 वॉगन दुरुस्तीहून आल्या आहेत. आठ वॅगन अद्याप यायच्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत त्या वॉगन दुरुस्त होऊन सोलापूर रेल्वे प्रशासनाकडे दाखल होतील. त्यानंतर त्या मिल्क एक्स्प्रेसला जोडल्या जातील.’’ सुशील गायकवाड, विभागीय जनसंपर्क अधिकारी, सोलापूर


0मिल्क एक्स्प्रेसच्या झाल्या 58 फेर्‍या
03 कोटी 90 लाख लिटर दुधाचा पुरवठा
0निम्मा वाटा सोलापूरचा