आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईदसाठी पाच लाख लिटर दूध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रमजानच्या शिरखुर्म्यासाठी विविध दूध संस्थांनी पाच लाख लिटर दूध विक्रीसाठी ठेवले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच विक्री केंद्रे कार्यान्वित झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत वितरणाचे काम होईल. फॅटनिहाय 28 ते 32 रुपये प्रती लिटर त्याचे दर आहेत. जिल्हा दूध संघ, सोनाई, दूध पंढरी, शिवामृत, लोकमंगल, राजहंस आदी संस्थांनी दुधाची साठवणूक करून खास रमजानसाठी दूध वितरणाचे नियोजन केले. दूध संघाने मोठय़ा विक्री केंद्रांवर टँकरच उभे केले.

इतर संस्थांनी कॅन, बंद पाकिटे आणि सुट्या स्वरूपातील दूध ठेवले आहे. रात्रभर विक्री सुरू असेल. ग्राहकांनी स्वच्छ घागरी आणाव्यात. शक्यतो त्या पितळी असल्या पाहिजेत, असे आवाहन विक्री व्यवस्थापकांनी केले.

येथे आहेत विक्री केंद्रे
समाचार चौक, जोडभावी पेठ, बारा इमाम चौक, किडवाई चौक, बेगम पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ, न्यू पाच्छा पेठ, शास्त्री नगर, नई जिंदगी, कुमठा नाका, सात रस्ता, रेल्वे स्थानक, आसरा, जुळे सोलापूर, विजापूर नाका, सैफुल, मोदी, चांदनी चौक, दमाणी नगर, विडी घरकुल, मोमीन नगर, गोदूताई नगर.

शिवामृतचे दोन लाख लिटर
शिवामृत दूध संघाने एक लाख 95 हजार लिटर दुधाच्या विक्रीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांची व्यवस्था व्हावी, या दृष्टीने विक्री केंद्रे सुरू केली.’’ पंडित देशमुख, व्यवस्थापक

‘लोकमंगल’ने रमजान ईदनिमित्त शहरात 50 हजार लिटर दूध विक्रीचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये लोकमंगलची विक्री केंद्रे सुरू केली. मागणी तसा पुरवठा करण्याचे काटेकोर नियोजनही केले आहे.’’ मनीष देशमुख, व्यवस्थापकीय संचालक