आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी ‘एमआयएम’चे चाचपणी नाट्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येत्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ‘एमआयएम’ने उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष चाचपणी नाट्यच सुरू ठेवले आहे. गुरुवारी झालेल्या तिसऱ्या दौऱ्यातही शहरातील अल्पसंख्याक समाजातील काही प्रतिष्ठितांच्या गाठी-भेटी घेण्याचाच सोपस्कार केल्याचे वृत्त आहे. या मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेसवर दबाव टाकण्याचा हा खटाटोप असल्याचे चित्र आहे.
मुस्लिमबहुल मतदारसंघात उमेदवार देऊन पक्षसंघटन बळकट करण्याचा प्रयत्न ‘एमआयएम’चा कायम राहिला आहे. सोलापूर शहर मध्य मध्ये दक्षिण सोलापूर, अक्कलकोट मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने मोठी आहे. या मतदार संघातून इच्छुकांची चाचपणी म्हणून काही नेते गुपचूप येऊन कानोसा घेत आहेत. प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांशी कसलीच जाहीर भूमिका व्यक्त केली जात नाहीत. त्यामुळे पक्षाच्या आणि स्थानिक नेत्यांची ही रणनीती काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी की प्रत्यक्ष निवडणुकीचे मैदान लढण्याची तयारी आहे, हे स्पष्ट होत नाही. जनमानसात प्रतिमा चांगली असलेला अवैध व्यवसाय अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार शोधण्याचा पक्ष प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. यासाठी गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा हे पथक आलेे.मात्र, अजून तरी उमेदवार निश्चित केलेला नाही.
तौफिक शेख यांची भेट
‘शहरमध्य’मधून एमआयएमकडून तौफिक शेख, मुश्ताक लालकोट, इम्तियाज पटेल इच्छुक आहेत. संबंधित पथकाने बुधवारी हॉटेल लोट्स येथे तौफिक शेख यांची घेतल्याचे वृत्त आहे. तौफिक हे माजी महापौर आरिफ शेख यांचे बंधू असल्याने काँग्रेसवर दबाव टाकण्याची ‘एमआयएम’ची ही रणनीती असल्याचे वृत्त आहे.
पाच सदस्यांचे पथक
पाचसदस्यीय पथकात हैदराबादचे दोन नगरसेवक सहभागी होते. या पथकाने शास्त्री नगर, मौलाली चौक, नई िजंदगी, विजापूर वेस, िकडवाई चौक, बेगम पेठ, मुस्लिम पाच्छा, भवानी पेठ आदी भागात फिरून मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत स्थानिक नेते, कार्यकर्तेही नव्हते, असे सांगितले जाते.