आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरात "एमआयएम’च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सोलापूर एमआयएमच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून मोठा आनंद व्यक्त केला. औरंगाबादमध्ये ज्या पध्दतीने दलित-ओबीसी-अल्पसंख्याक वर्गाचे सोशल इंजिनिअरिंग राबवले तसाच प्रयोग सोलापुरात राबवण्याचा निर्धार केला.

गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उत्साहात तौफिक शेख यांचा सत्कार केला. एमआयएमच्या ‘जिंदाबाद’चा नारा लावण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष तौफिक शेख, जिल्हाध्यक्ष रमेश गावडे, महिबूब कुमठे, आसिफ राजे, अश्फाक शेख, मुदस्सर शेख, शुकूर मनाजी, हिमायत पटेलसह अनेकजण उपस्थित होते.

तौफिक शेख रमेश गावडे म्हणाले, “औरंगाबादमध्ये मुस्लिमच नव्हे तर मागासवर्गीयांमधील सर्व घटकांनी ‘एमआयएम’वर विश्वास दाखवला. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सोशल इंजिनिअरिंगसाठी ‘औरंगाबाद’ने आम्हाला प्रेरणा दिली आहे. आमचा आत्मविश्वास वाढवला आहे.''

फोटो - औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाला घवघवीत यश मिळाल्याबद्दल सोलापुरातील एमआयएम कार्यकर्त्यांनी तौफिक शेख यांना मिठाई भरवून जल्लोष केला.