आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यच्या मुस्लिम मतांवर "एमआयएम'चा डोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदारसंघात आॅल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनने (एमआयएम) उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बरीच मंडळी इच्छुक अाहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत उमेदवार निश्चीत होतील, अशी मािहती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद यांनी
"दिव्य मराठी'ला दिली.

मध्य िवधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख मुस्लिम मतदार आहे.गैरमुस्लिम मतदारांची संख्याही सुमारे दीड लाखाहून अधिक आहे. यात सर्वात मोठी संख्या पद्मशाली समाजाची आहे. मुस्लिम मतदारांच्या संख्येनंतर पद्मशाली समाजाच्या मतदारांची संख्या ४० हजार आहे. मुस्लिम मतदार उमेदवाराचे भवितव्य निश्चित करू शकतो. म्हणून इथे पक्षाने उमेदवार देण्याचा िनर्णय घेतला. विदर्भ, मराठवाडा, मुंबई आदी शहरांसह मुस्लिमबहुल मतदारसंघात पक्षाने सर्वे केला. त्याच्या यादीत सोलापूर शहर मध्यचा समावेश आहे. सोलापूरच्या अनेक नेत्यांनी पक्षाशी संपर्क साधला.

दोन दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाच्या नेतेमंडळींनी सोलापुरात सर्व्हे केला. उमेदवारांची चाचपणी केली. जेणेकरून तो कोणालाही मॅनेज होऊ नये किंवा समाजाचा आिण पक्षाचा वापर करू नये, याची काळजी घेत असल्याचेही श्री. सय्यद यांनी स्पष्ट केले.

उमेदवार मॅनेज होण्याची शक्यता
शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांच्या मतांची विभागणी व्हावी आिण जास्तीत जास्त मते आपल्याच पक्षाला मिळािवत असा प्रयत्न काँग्रेस आिण महायुतीकडून होणार आहे. एमआयएमने उमेदवार निश्चित केल्यानंतर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, अपक्ष असे मिळून सुमारे पाच ते सहा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपा आिण शिवससेनेकडून त्यांच्या मर्जीतला मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. कारण जेवढे मुस्लिम उमेदवार रिंगणात असतील तेवढे मुस्लिम मतांची विभागणी होईल आिण याचा फायदा युतीच्या उमेदवाराला होईल.